IPL 2020 : आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये रविवारी मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सने 8 विकेट्सनी पराभव केला. परंतु, पराभवानंतरही हार्दिक पांड्या या सामन्यात चाहत्यांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरला. हार्दिक पांड्याने 'ब्लॅक लाइव्स मॅटर' आंदोलनाचं समर्थन करणारा पहिला आयपीएल खेळाडू आहे. हार्दित पांड्याने मैदानावरच आपले गुडघ्यावर बसत आंदोलनाचं समर्थन केलं.
राजस्थान रॉयल्स विरोधात हार्दिक पांड्याने धमाकेदार खेळी केली होती. पांड्याने 19व्या ओव्हरमध्ये कार्कि त्यागीच्या चेंडूवर आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यनंतर लगेचच पांड्या 'ब्लॅक लाइव्स मॅटर' आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी मैदानातच गुडघ्यांवर बसला. पांड्याने हा फोटो आपल्या सोशल मीडिया आकाउंट्सवर शेअर केला आहे.
काय आहे 'ब्लॅक लाइव्स मॅटर' आंदोलन?
अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी एका जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी रस्त्यावर पकडलं होतं. एका पोलिसाने फ्लॉइडला जमिनीवर पाडण्यात आलं होतं. आणि त्यांची मान आपल्या गुडघ्याखाली बराच वेळ दाबून ठेवली होती. त्यामध्येच फ्लॉईड यांचा मृत्यू झाला होता. आपल्या मानेवरील गुडघा हटवण्यासाठी फ्लॉइड पोलीस अधिकाऱ्याला विनवण्या करत राहिले. परंतु, त्या पोलिसाने आपला गुडघा हटवला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ लोकांनी रेकॉर्ड केला. संपूर्ण अमेरिकेत या घटनेच्या निषेधार्थ लोकांमध्ये हिंसाचार उसळला होता.
कृष्णवर्णींयांसोबत होणारा भेदभाव आणि अन्यायाला वाच फोडण्यासाठी 'ब्लॅक लाइव्स मॅटर' आंदोलनाची सुरुवात झाली होती. यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांना अनेक प्रश्नही विचारण्यात आले होते. खेळाडूंसह अनेक दिग्गजांनी या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. संपूर्ण जगभरात या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
जेसन होल्डरने व्यक्त केली होती खंत
वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील स्टार खेळाडू जोस होल्डरने आयपीएल 2020 मध्ये 'ब्लॅक लाइव्स मॅटर' आंदोलनावर चर्चा न झाल्यामुळे निराशा व्यक्त केली होती. दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये 'ब्लॅक लाइव्स मॅटर' आंदोलनाचं समर्थ केलं होतं. इंग्लंड आणि वेस्टइंडिजच्या सर्व खेळाडूंनी प्रत्येक सामन्याआधी 'ब्लॅक लाइव्स मॅटर' आंदोलनाचं गुडघ्यावर बसून समर्थन केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :