IPL 2020 : रविवारी मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सने 8 विकेट्सनी पराभव केला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची समस्यांमध्ये आणखी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. संघाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे गेल्या काही सामन्यांपासून संघाचं नेतृत्त्व पोलार्ड करत आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या संघासाठी सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, दुखापतीमुळे मुंबईच्या पुढच्या सामन्यातही रोहित शर्माच्या संघवापसीची अपेक्षा फार कमी आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या वतीने रोहित शर्माच्या दुखापतीसंदर्भात
कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग इंज्युरीमधून अद्याप बरा होऊ शकलेला नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पोलार्डच्या खांद्यांवर गेल्या दोन सामन्यांपासून कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ईशाक किशन ओपनिंग बॅट्समनची जबाबदारी सांभाळत आहे.'


संघाचा स्टार खेळाडू डी कॉकला रविवारी रोहित शर्माच्या दुखापतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. डी कॉक म्हणाला की, 'रोहित शर्मा कधी संघात परत येणार यासंदर्भात आम्ही आता काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला एवढंच सांगू शकतो की, रोहित शर्माच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.'


न्यूझिलंड दोऱ्यातही झाली होती दुखापत


दरम्यान, रोहित शर्माने या सीझनमध्ये आपल्या खराब फिटनेसमुळे निशाण्यावर आहे. लॉकडाऊन दरम्यान रोहित शर्माचं वजन फारचं वाढलं होतं. त्यामुळे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहेवागने रोहितला टोला लगावत 'वडा पाव' असंही म्हटलं होतं.


यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मा दुखापतीमुळे त्रस्त आहे. रोहित शर्माला न्यूझीलंड विरोधात फेब्रुवारीमध्ये शेवटच्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळेच टेस्ट सीरिजमध्येही तो सहभागी होऊ शकला नव्हता. आयपीएलमध्ये रोहित शर्माने जवळपास 6 महिन्यांनी मैदानावर वापसी केली होती.


धोनीच्या सीएसकेला मोठा धक्का; पहिल्यांदाच प्लेऑफमधून बाहेर


पहिल्यांदाच चेन्नई प्लेऑफमधून बाहेर


इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. रविवारी सीएसकेने आरसीबीला 8 विकेट्सनी मात दिली. परंतु, चेन्नईला मिळालेला हा विजय संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी पुरेसा नव्हता. रविवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स विरोधात विजय मिळवला. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा चेन्नईचा संघ आयपीएलच्या 13 व्या सीझनमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला पहिला संघ आहे.


IPL 2020 : प्ले-ऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर; अशा होणार लढती


प्ले-ऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

यंदा कोरोनामुळे बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेली ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा प्लेऑफच्या सामन्यांची ठिकाणं आणि तारखी सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCIने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं. त्यामुळे आयपीएलच्या तेराव्या मोसमातं आता खऱ्या अर्थाने रंगत यायाला सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :