SRH vs LSG : दोन 'क्लासिक' कर्णधारांमध्ये आजची लढत, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
आयपीएलमध्ये आज दोन धाकड संघात लढत पार पडणार आहे. यामध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे.
SRH vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा 12 वा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघ मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाची विशेषत: म्हणजे दोन्ही संघाचे क्लासिक कर्णधार. अगदी उत्तम दर्जाचे फलंदाज असणारे केएल राहुल आणि केन विल्यमसन यांच्यातील या लढतीत दोन्ही कर्णधार नेमकी कोणत्या खेळाडूंना आज संधी देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
आज पार पडणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी याआधीच्या सामन्यात खेळलेल्या खेळीचा विचार करता नेमके कोणते खेळाडू (Probable 11 for LSG vs SRH) मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया...
हैदराबादचे संभाव्य अंतिम 11
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), अॅडन मार्करम, अब्दुल समाद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक.
लखनौ संभाव्य अंतिम 11
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हु़डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, दुश्मंता चमीरा, अँड्रयू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान
हे देखील वाचा-
- IPL 2022, SRH vs LSG : लखनौसमोर आज हैदराबादचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- CSK vs PBKS: पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव
- CSK vs PBKS: चेन्नईमधून 'या' खेळाडूला मिळाला डच्चू, पंजाबनेही दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha