"रिश्ते में तो हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है हार्दिक पांड्या"; मुंबई इंडियन्सच्या नव्या कॅप्टनचा रोख नेमका कुणीकडे?
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनासह हार्दिक पांड्यालाही ट्रोल करण्यास सुरुवात केली. रोहित शर्माचं काय? या प्रश्नानं सर्वांना हैराण करुन सोडलं? रोहित शर्मा आयपीएल खेळणार नाही या अफवांपासून ते रोहित चेन्नईमधून खेळणारपर्यंत अनेक चर्चा रंगल्या.
Hardik Pandya, IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार कोण तर झोपेतून उठून कोणीही रोहित शर्माचंच (Rohit Sharma) नाव घ्यायचं. पण आयपीएल 2024 (IPL 2024) चं बिगुलं वाजलं अन् मुंबई इंडियन्सचं चित्र बदललं. आयपीएलमधील (Indian Premier League) सर्वात यशस्वी प्रॅन्चायझींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सनं टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून घोषित केलं. तेव्हापासून क्रिडाविश्वात खळबळ माजली. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनासह हार्दिक पांड्यालाही ट्रोल करण्यास सुरुवात केली. रोहित शर्माचं काय? या प्रश्नानं सर्वांना हैराण करुन सोडलं? रोहित शर्मा आयपीएल खेळणार नाही या अफवांपासून ते रोहित चेन्नईमधून खेळणारपर्यंत अनेक चर्चा रंगल्या. अजुनही चर्चा सुरूच आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्यानं एक बॉलिवूड डायलॉग आपल्या स्टाईलमध्ये म्हटला आहे. त्यावरुन सध्या क्रिडा विश्वात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
"रिश्ते में तो हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है हार्दिक पांड्या"
IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स (MI) चा कर्णधार म्हणून दिसणार आहे. गुजरात टायटन्स सोडल्यानंतर हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि काही दिवसांनंतर फ्रँचायझीनं त्याला रोहित शर्माच्या जागी कॅप्टन बनवलं. मुंबईनं हार्दिकला कॅप्टन केल्यानं एमआयचे चाहते खूपच नाराज झाले होते.
"Rishte me to hum tumhare Captain lgte hai, naam hai Pandya"🔥#HardikPandya #MumbaiIndians#IPL2024 pic.twitter.com/N3FI5UHvDO
— Rohan Gangta (@rohan_gangta) March 2, 2024
आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या "रिश्ते में तो हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है हार्दिक पांड्या", असं म्हणताना दिसतोय. हार्दिकनं या डायलॉगमधून कोणावरही निशाणा साधला अशा चर्चा रंगल्या आहेत. तरी त्यामागचं सत्य काही वेगळंच आहे. 'स्टार स्पोर्ट्स'च्या एका शोमध्ये हार्दिकनं हा डायलॉग म्हटला आहे.
11 ऑक्टोबरला हार्दिक पांड्याचा वाढदिवस आहे. शोमध्ये अँकरनं प्रश्न विचारला की, हार्दिकचा वाढदिवस कधी आहे? यावर बोलताना चाहत्यानं सांगितलं की, 11 ऑक्टोबर . पण तेवढ्यात एका फॅनला आठवलं की, 11 ऑक्टोबरला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यानंतर फॅननं हार्दिकला अमिताभ बच्चन यांच्यासोबत वाढदिवस शेअर करतोस तर त्यांचा एक डॉयलॉगही होऊन जाऊ देत. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधारानं एकदम दणक्यात अमिताभ बच्चन यांचा फेमस डायलॉग "रिश्ते में तो हम तुम्हारे कैप्टन लगते हैं, नाम है हार्दिक पांड्या" म्हटला.
वर्ल्डकप 2023 मध्ये दुखापतग्रस्त, IPL 2024 पूर्वी पुनरागमन
महत्त्वाची बाबा म्हणजे, हार्दिक पांड्या विश्वचषक 2023 दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, त्यानंतर तो डीवाय पाटील टी-20 चषक 2024 मधून मैदानात परतला होता. यानंतर हार्दिक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिकचे पुनरागमन झालं आहे. त्यानं मुंबईतूनच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.