IPL 2022: 'मागच्या सीजनमध्येच कळालं होतं टॅलेंट,' हरभजन सिंहकडून आरसीबीच्या 'या' खेळाडूचं कौतुक
आयपीएल 2022 (Ipl 2022) स्पर्धेच्या एलिमेनेटर सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने लखनौ संघाला मात देत क्वॉलीफायर 2 मध्ये झेप घेतली असून आज त्यांचा सामना राजस्थानशी आहे.
Harbhajan singh : क्रिकेटच्या मैदानात अनेक खेळाडूंचं पुनरागमन अतिशय प्रेरणादायी असतं, आता देखील 36 वर्षीय दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आयपीएल 2022 (IPL 2022) दमदार खेळीच्या जोरावर पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत निवडला गेला आहे. आरसीबीचा आणखी एक खेळाडू सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे लखनौविरुद्ध शतक ठोकणारा रजत पाटीदार (Rajat Patidar). भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) देखील रजतचं कौतुक करत त्याच्याबद्दलता एक किस्सा शेअर केला आहे.
माजी भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंहने रजत पाटीदारबद्दल बोलताना सांगितलं की, मागील वर्षी केकेआरकडून (KKR) खेळताना वेंकटेश अय्यरने रजतबद्दल एक खास गोष्ट सांगतिली होती. त्याने रजतचं कौतुक करत तो एकट्याच्या जीवावर संघाला विजय मिळवून देऊ शकतो. असं सांगितलं होतं. ज्यानंतर आता रजतने लखनौविरुद्ध 112 धावांची तुफानी खेळी पूर्ण करत हे सिद्ध देखील केलं. त्यामुळे रजतच्या टॅलेंटबद्दल हरभजनला मागील सीजनमध्येच कळाल्याचं त्याने सागितलं आहे.
सोबती खेळाडूंनी दिलं 'हनुमान' नाव
रजत पाटीदार (Rajat Patidar) हा मध्य प्रदेशसाठी स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने 2015 साली डेब्यू केला होता. त्याच्याबद्दल बोलताना एकदा गोलंदाज ईश्वर पांडे (Ishwar Pandey) यांनी तो संघासाठी हनुमानासारखा आहे. कायम संकटात संघाची मदत करण्यासाठी येत असतो. त्याने अनेक अशा दमदार खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे रजतला हनुमान हे नाव पडलं. विशेष म्हणजे महत्त्वाच्या सामन्यात रजत आरसीबीसाठीही हनुमानच ठरला आहे.