IPL सुरु होण्याआधी मोठा बदल, राजस्थानच्या ताफ्यात मुंबईचा भिडू, तर गुजरातमध्येही युवा खेळाडू
IPL 2024 : अवघ्या काही तासांनंतर आयपीएलच्या 17 पर्वाचं (IPL 2024) रणशिंग फुंकलं जाणार आहे. आज संध्याकाळी आठ वाजता आयपीएल 2024 चा पहिला सामना होणार आहे.
IPL 2024 : अवघ्या काही तासांनंतर आयपीएलच्या 17 पर्वाचं (IPL 2024) रणशिंग फुंकलं जाणार आहे. आज संध्याकाळी आठ वाजता आयपीएल 2024 चा पहिला सामना होणार आहे. त्याआधीच दोन संघांनी आपल्या संघात बदल केला आहे. जखमी खेळाडूंच्या जागी रिप्लेसमेंटची (replacement) घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघांनी आपल्या ताफ्यात अखेरच्या क्षणी खेळाडूला स्थान दिले आहे. गुजरातचा रॉबिन मिंज हा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता. तर अॅडम झम्पा यानं अखेरच्या क्षणी राजस्थान रॉयल्सला बाय बाय म्हटलं होतं. या दोन्ही खेळाडूंच्या रिल्पेमेंटची घोषणा केली आहे. आयपीएलनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
गुजरातच्या ताफ्यात नवखा भिडू -
गुजरात टायटन्सने रॉबिन मिन्झ याच्या जागी बी.आर शरथ याचा संघात समावेश केला आहे. बी.आर शरथ हा विकेटकिपर फलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 20 फर्स्ट क्लास आणि 43 लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये 28 टी 20 सामने खेळण्याचाही अनुभव आहे. गुजरातने शरथ याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
राजस्थानच्या ताफ्यात मुंबईचा भिडू -
राजस्थानच्या ताफ्यात मुंबईकर तनुष कोटियान याला घेण्यात आले आहे. तनुषला राजस्थाननं 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलेय. नुकत्याच झालेल्या रणजी चषकात त्यानं शानदार कामगिरी केली होती. मुंबईच्या विजयात त्यानं सिंहाचा वाटा उचललाय. तनुषने मुंबईचं 23 टी-20, 26 फर्स्ट क्लास आणि 19 लिस्ट ए सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तर तनुषने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 24, 75 आणि 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 62, 1152 आणि 90 अशा धावा केल्या आहेत.
🚨 NEWS 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
Gujarat Titans add B R Sharath to squad as replacement for Robin Minz; Tanush Kotian joins Rajasthan Royals in place of Adam Zampa. #TATAIPL
More Details 🔽https://t.co/U6RLIIB9Id