GT vs RR : राजस्थानने नाणेफेक जिंकली, गुजरातची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
GT vs RR, IPL 2023 Match 22 : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
GT vs RR, IPL 2023 Match 22 : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेसमास्टर गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. हार्दिक पांड्या नेतृत्वात गुजरात संघ फॉर्मात आहे. आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स कशी कामगिरी करतो.. याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
गुजरात आणि राजस्थान संघात काही बदल करण्यात आले आहेत. गुजरातकडून विजय शंकर आज प्लेईंग ११ चा भाग नाही. अभिनव मनोहर याला संधी देण्यात आली आहे. दोन्ही संघात कुणाला मिळाली संधी.. कोण कोण आहे प्लेईंग ११ मध्ये
राजस्थान रॉयल्सचे ११ शिलेदार कोण ?
जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, एडम जम्पा, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल
गुजरातमध्ये कोण कोण
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा
गुजरात आणि राजस्थान आमने-सामने
सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात (IPL 2023) आज गुजरात (GT) आणि राजस्थान (RR) एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आज मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ समान पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.