GT vs MI, IPL 2023 Live : गुजरातचा मुंबईवर 55 धावांनी विजय
GT vs MI Live Score: गुणतालिकेत चौथ्या क्रमांकाचा संघ गुजरात आणि सातव्या क्रमांकाचा संघ मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे.
LIVE
Background
IPL 2023, Match 35, GT vs MI: आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 35 वा सामना आज, 25 एप्रिलला गुजरातच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. गुणतालिकेत चौथ्या क्रमांकाचा संघ गुजरात आणि सातव्या क्रमांकाचा संघ मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे.
IPL 2023, MI vs GT : मुंबई विरुद्ध गुजरात लढत
गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आज 25 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहेत. यजमान गुजरात संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील सहा सामन्यांपैकी चार विजय नोंदवून हंगामाची सुरुवात चांगली केली आहे. गुजरात संघ सध्या आयपीएल 2023 गुणतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाहुण्या मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले तर तीन सामने गमावले आहेत. मुंबईं संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
GT vs MI Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात (GT) आणि मुंबई (MI) या संघांमध्ये आतापर्यंत एकच सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यामध्ये मुंबई संघाने विजय मिळवला होता. आयपीएल 2022 मध्ये मुंबई आणि गुजरात संघ पहिल्यांदा आमने-सामने आले होते आणि हा सामना मुंबईने पाच धावांनी जिंकला होता.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ समान पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन संघामध्ये 25 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
फिरकीच्या जाळ्यात अडकला मुंबईचा संघ -
गुजरातच्या फिरकी गोलंदाजाच्या जाळ्यात मुंबईचा संघ अडकला. राशिद खान आणि नूर अहमद या दोघांनी मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला. राशिद खान याने चार षटकात 27 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर नूर अहमद याने चार षटकात 37 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. मोहम्मद शमीने चार षटकात फक्त 18 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने दोन षटकात 10 धावा देत एक विकेट घेतली. जोश लिटिल याने दोन षटकात 18 धावा खर्च केल्या. मोहित शर्मा याने मुंबईच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले.
गुजरातचा मुंबईवर 55 धावांनी विजय
गुजरातचा मुंबईवर 55 धावांनी विजय
मुंबईला नववा धक्का, अर्जुन तेंडुलकर 13 धावांवर बाद
मुंबईला नववा धक्का, अर्जुन तेंडुलकर 13 धावांवर बाद
सूर्यकुमार यादव बाद
सूर्यकुमार यादव 23 धावांवर बाद
मुंबईची फलंदाजी ढेपाळली
रोहित शर्मा दोन धावांवर बाद झाला. ईशान किशन याने 13 धावांचे योगदान दिले. तर कॅमरुन ग्रीन 33 धावा काडून तंबूत परतला. तिलक वर्मा फक्त दोन धावांवर बाद झाला. टम डेविड याला खातेही उघडता आले नाही. सध्या सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा खेळत आहेत.