(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहितपुढे हार्दिकचे आव्हान, क्वालिफायर 2 सामना कधी, कुठे पाहाल
GT vs MI Qualifier 2 Live Streaming: मुंबई आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे. यातील विजेता संघ रविवारी चेन्नईसोबत दोन हात करेल.
GT vs MI Qualifier 2 Live Streaming: मुंबई आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे. यातील विजेता संघ रविवारी चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरातचा चेन्नईकडून पराभव झाला.. तर मुंबईने लखनौचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय. गतविजेता आणि पाच वेळा आयपीएच चषक जिंकणाऱ्या मुंबईमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
गुजरात (GT) आणि मुंबई (MI) यांच्यात शुक्रवारी, 26 मे रोजी सामना रंगणार आहे. क्वालिफायर 2 चा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये धडक मारेल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.
मुंबईची संभावित प्लेईंग 11
1 रोहित शर्मा (कर्णधार), 2 इशान किशन (wk), 3 सूर्यकुमार यादव, 4 टीम डेविड, 5 तिलक वर्मा, 6 कॅमरुन ग्रीन, 7 ख्रिस जॉर्डन, 8 ह्रतिक शौकिन, 9 पीयूष चावला, 10 जेसन बेहरनड्रॉफ, 11 आकाश मधवाल
Substitutes : नेहल वढेरा, रमनदीप सिंह, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेय, संदीप वॉरियर
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11
वृद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, अल्जारी जोसेफ, मोहित शर्मा, मोहम्मद शमी