IPL 2022 : नाणेफेकीवेळी राहुलचा झाला गोंधळ, हार्दिकला म्हणाला....
IPL 2022 Marathi News : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीवेळी लखनौचा कर्णधार केएल राहुलचा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

IPL 2022 Marathi News : पुण्याच्या एमसीए मैदानावर गुजारत आणि लखनौ यांच्यात आयपीएलचा 57 वा सामना सुरु आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीवेळी लखनौचा कर्णधार केएल राहुलचा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं झाले काय?
राहुल आणि हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी मैदानात आले होते. राहुलने कॉईन हवेत उंचावला.. त्यावेळी हार्दिक पांड्याने हेड म्हटले... काईन खाली आल्यानंतर राहुलने हार्दिकला टेल्स म्हणाला होतास ना... असे विचारले.. त्यावर हार्दिक पांड्या हसला अन् हेड म्हणाले होतो.. असे सांगितले.. त्यानंतर हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा व्हिडीओ....
#GujaratTitans have won the toss and they will bat first against #LSG.
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2022
Live - https://t.co/45TbqyBfE3 #LSGvGT #TATAIPL pic.twitter.com/pQB53PfPD3
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात खराब झाली. वृद्धीमान साहा पाच धावा काढून बाद झाला..त्यानंतर मॅथ्यू वेड आणि हार्दिक पांड्याही झटपट बाद झाले.. मॅथ्यू वेड दहा तर हार्दिक पांड्या 11 धावांवर बाद झाला... एका बाजूला विकेट पडत असताना सलामी फलंदाज शुभमन गिल संयमी फलंदाजी करत होता.. पण दुसऱ्या बाजूला एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या... गिलने मिलरसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मिलर 26 धावा काढून बाद झाला.. मिलरने 24 चेंडूत 26 धावांची खेळी केली. त्यानंतर राहुल तेवातियाने अखेरच्या षटकात फटकेबादी करत संघाचा डाव 140 पार नेला. राहुल तेवातियाने 16चेंडूत 22 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राहुल तेवातियाने चार चौकार लगावले. शुभमन गिलने एका बाजूने गुजरातचा डाव सावरला. गिलने 49 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान गिलने सात चौकार लगावले. महत्वाचे म्हणजे, गुजरातच्या डावात फक्त एक षटकार गेला..एकमेव षटकार मिलरने लगावला. गुजरातच्या डावात 15 चौकार बसले.
लखनौकडून मोहसीन खान याने कंजूष गोलंदाजी केली. मोहसीन खानने चार षटकात 18 धावा देत एक विकेट घेतली. तर आवेश खानने चार षटकात 26 धावा देत दोन विकेट घेतल्या. जेसन होल्डरनेही एक विकेट घेतली.



















