GT vs CSK, IPL 2023 Qualifier 1 Live: फायनलमध्ये कोण जाणार? हार्दिक-धोनीमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
IPL 2023, Qualifier 1, GT vs CSK: चेपॉक स्टेडिअमवर गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यात लढत होणार आहे. विजेता संघ फायनलमध्ये धडक मारेल.
धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने गुजरातचा पारभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने पहिल्यांदाच गुजरातचा पराभव केला.. याआधी झालेल्या तिन्ही सामन्यात गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नईने दहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.. चेन्नईचा संघ २८ मे रोजी पाचव्या आयपीएल चषकासाठी मैदानात उतरले.
धोनीच्या चेन्नईची फायनलमध्ये धडक
गुजरातला मोठा धक्का... राशिद खान बाद
गुजरातला आठवा धक्का बसलाय.. दर्शन नळकांडे बाद
गुजरातला सातवा धक्का बसलाय.. विजय शंकर बाद
गुजरातला सहावा धक्का बसलाय.. राहुल तेवातिया बाद
गुजरातला मोठा धक्का बसलाय.. शुभमन गिल ४२ धावांवर बाद झालाय
गुजरातला चौथा धक्का... डेविड मिलर बाद
दासुन शनाकाच्या रुपाने गुजरातला तिसरा धक्का... रविंद्र जाडेजाने शनाकाला १७ धावांवर केले बाद
गुजरातला दुसरा धक्का.. हार्दिक पांड्या आठ धावांवर बाद झाला
गुजरातला पहिला धक्का.... साहा बाद
IPL 2023 Qualifier 1, GT vs CSK: ऋतुराज गायकवाडच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित २० षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाड याने ६० धावांची खेळी केली. गायकवाडचा अपवाद वगळता चेन्नईच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. गुजरातच्या गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या. शमी-शर्मा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. गुजरातला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान आहे.
चेन्नईची १७२ धावांपर्यंत मजल
रविंद्र जाडेजा बाद
धोनी एका धावेवर बाद झाला... मोहित शर्माने घेतली विकेट
चेन्नईचा अर्धा संघ तंबूत... रायडू १७ धावांवर बाद
चेन्नईला चौथा धक्का बसलाय... अजिंक्य रहाणे याच्यानंतर डेवेन कॉनवेही बाद झालाय
चेन्नईला दुसरा धक्का बसलाय.. शिवम दुबे बाद
चेन्नईला पहिला धक्का... अर्धशतकानंतर गायकवाड बाद
ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक
गायकवाड कॉनवेची अर्धशतकी भागिदारी
गायकवाड-कॉनवेची दमदार सुरुवात
CSK vs GT Qualifier 1: हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्वालिफायर १ या मोक्याच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने मोठा बदल केला. हार्दिक पांड्याने यश दयाल याला प्लेईंग ११ मधून बाहेर बसवलेय. यश दयाल याच्या जागी विदर्भाच्या दर्शन नळकांडे याला संघात स्थान दिलेय.. यंदाच्या आयपीएलमध्ये दर्शन पहिलाच सामना खेळत आहे... मोक्याच्या सामन्यात दर्शन कशी कामगिरी करतोय... याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.... सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा..
चेन्नईची फलंदाजी सुरु. गायकवाड-कॉनवे फलंदाजीसाठी मैदानावर
ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोइन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान और विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दर्शन नळकंडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी
धोनीलाही प्रथम गोलंदाजी करायची होती. चेपॉकच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात धावांचा पाऊस पडतो.. या मैदानावर फिरकीला मदत मिळण्याची शक्यता आहे. धोनीने आजच्या सामन्यात संघात कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवलाय. यंदाच्या हंगामात दहाव्यांदा धोनीने कोणत्याही बदलाशिवाय संघ उतरवलाय. दुसरीकडे मोक्याच्या सामन्यात हार्दिक पांड्याने यश दयाल याला बाहेर बसवलेय.. हार्दिक पांड्याने महाराष्ट्रातील Darshan Nalkande दर्शन नलकांडे याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली....प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली
गुजरात - चेन्नईचे संघ सज्ज झाले आहेत.. धोनी आणि हार्दिक नाणेफेकीसाठी येणार
थोड्याच वेळात नाणेफेक होणार
चेन्नई आणि गुजरात हे दोन संघ यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत. गुजरात संघाने 14 पैकी 10 सामने जिंकून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे, चेन्नई संघाने 14 सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे गुजरात आणि चेन्नईमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
पार्श्वभूमी
GT vs CSK Qualifier 1 Live:
आयपीएल 2023 (IPL 2023) चा पहिला क्वालिफायर (Qualifier 1) सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर (Chepauk Stadium) चेन्नई आणि गुजरात या संघात खेळवला जाणार आहे. आयपीएलचा यंदाचा सोळावा हंगाम फारच रोमांचक ठरला आहे. शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शर्यत सुरु होती. आज आयपीएल 2023 मधील पहिला क्वालिफायर गतविजेता गुजरात टायटन्स संघ आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघ यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे.
पहिला क्वालिफायर सामना चेन्नई विरुद्ध गुजरात
चेन्नई आणि गुजरात हे दोन संघ यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत. गुजरात संघाने 14 पैकी 10 सामने जिंकून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे, चेन्नई संघाने 14 सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे गुजरात आणि चेन्नईमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार आहे जाणून घ्या.
गुजरात संघाचं पारड जड
यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई संघावर पांड्याचा गुजरात संघ भारी पडला आहे. गुजरात संघ हंगामाच्या सुरुवातीपासूनच टॉप 4 मध्ये पाय रोवून आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई संघाला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई संघाने खातं थोडं उशिरा उघडलं मात्र, शेवटी चेन्नई संघानं दमदार प्रदर्शन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं.
गुजरात संघ चेस मास्टर
गुजरात टायटन्स संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची फलंदाजी. गुजरात संघ चेस मास्टर आहे. आतापर्यंत त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना फक्त तीन सामने गमावले आहेत. त्याचबरोबर गुजरातची गोलंदाजीही काही प्रमाणात चांगली आहे. त्यांच्या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. पण वेगवान गोलंदाजी त्यांची बाजू कमजोर आहे. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्यास संघाला खूप अडचणीत येतात.
चेन्नईची टॉप ऑर्डर जमेची बाजू
चेन्नई सुपर किंग्सची सर्वात मोठी ताकद ही त्यांची टॉप ऑर्डर आहे. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या फलंदाजीला तोड नाही. याशिवाय शिवम दुबेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये धावा जमवताना दिसत आहे. पण या तीन फलंदाजांव्यतिरिक्त मधल्या फळीतील किंवा खालच्या मधल्या फळीतील कोणत्याही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. गुजरातविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये चेन्नईची आघाडीची फळी ढासळली तर त्यामुळे गुजरात संघाला फायदा होऊ शकतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -