(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs GT Playing 11 : गतविजेता गुजरात विरुद्ध चार वेळा चॅम्पियन चेन्नई, धोनी विरोधात कशी असेल पांड्याची प्लेईंग 11
GT vs CSK Playing 11, IPL Qualifier 1 : चेन्नईतील चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने येणार आहेत.
IPL 2023 Qualifier 1 : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier league) यंदाच्या सोळाव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना आज, 23 मे रोजी खेळवला जाणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 2023 मधील 14 पैकी दहा सामने जिंकून गतविजेत्या गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) आयपीएल 2023 गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षी नवव्या स्थानावर राहिलेल्या महेंद्र सिंह धोनीच्या (Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने यावेळी आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करत दुसरं स्थान काबीज केलं आहे.
गुजरात आणि चेन्नई संघ आमने-सामने
चेन्नई (Chennai Super Kings) आणि गुजरात दोन्ही संघाची लढत आज चेन्नईतील चेपॉक मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल तर पराभूत संघाला दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागेल. विशेष म्हणजे चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई संघाला आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत गुजरात विरोधातील एकही सामना जिंकता आलेला नाही.
आजच्या सामन्यात 'या' खेळाडूंकडे लक्ष
दरम्यान, महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) टी20 फॉरमॅटचा बादशाह मानला जातो आणि त्यामुळे आगामी सामन्यात धोनीची रणनीती काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात चेन्नई (CSK) संघाचे फलंदाज ऋतुराज गायकवाड, शुभम दुबे, डेवॉन कॉनवे आणि गोलंदाज तुषार देशपांडे या खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष असेल. याशिवाय गुजरातचा (GT) फलंदाज शुभमन गिल आणि गोलंदाज राशिद खान आणि मोहम्मद शमी या खेळाडूंवर नजर असेल. शुभमन गिलने मागच्या सामन्यात सलग दुसरं शतकं ठोकलं आहे.
GT vs CSK Probable Playing XI : संभाव्य प्लेइंग इलेव्हन
GT Probable Playing 11 : गुजरात टायटन्स
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णदार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, दासून शनाका, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.
CSK Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महिषा तीक्षणा.