(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्पॉट फिक्सिंग ते शाहरुख खानला बॅन, IPL मधील पाच मोठे वाद
Five Biggest IPL Controversies : आयपीएल स्पर्धेने भारतीय क्रिकेटची दीशा बदलली आहे. पण, आयपीएलच्या या स्पर्धेत अनेकदा वादही झाले आहेत. पाहूयात, मागील 14 हंगामात आयपीएलमध्ये झालेले सर्वात मोठे पाच वाद..
Five Biggest IPL Controversies : 26 मार्चपासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. जगातील सर्वात चर्चेत असणारी ही क्रिकेट लीग 2008 मध्ये सुरु झाली. आतापर्यंत या लीगने अनेक क्रिकेटपटू दिले आहे. आयपीएल स्पर्धेने भारतीय क्रिकेटची दीशा बदलली आहे. पण, आयपीएलच्या या स्पर्धेत अनेकदा वादही झाले आहेत. पाहूयात, मागील 14 हंगामात आयपीएलमध्ये झालेले सर्वात मोठे पाच वाद..
1- स्पॉट-फिक्सिंग -
2013 मध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला डाग लागला. कारण, 2013 मध्ये तीन खेळाडूंवर स्पॉट फिग्सिंगचा आरोप लागला. यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदीला यांना अटक कऱण्यात आली. या तिन्हीही खेळाडूंवर अजीवन बंदी घालण्यात आली. श्रीसंतने आपल्यावरील बंदीला कोर्टत दाद मागितली अन् कोर्टाकडून दिलासा मिळाला. पुन्हा त्याला खेळण्याची परवानगी मिळाली. पण नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात त्याला कुणीही खरेदी केले नाही.
2- चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघावर बंदी -
सट्टेबाजी केल्याच्या आरोपा झाल्यानंतर चेन्नई आणि राज्यस्थान संघाला दोन वर्षासाठी आयपीएलमधून बॅन करण्यात आले होते. चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्राही यामध्ये दोषी आढळले होते.
3- शाहरुख खानवर निर्बंध-
आयपीएल 2012 मध्ये केकेआरचे मालक शाहरुख खान याच्यावर वानखेडे स्टेडिअमवर बंदी घालण्यात आली होती. मैदानावरील कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप शाहरुख खानवर होता. 2015 नंतरही ही बंदी उठवण्यात आली.
4- हरभजन सिंह आणि श्रीसंत विवाद -
आयपीएलमधील पहिला वाद पहिल्या हंगामातच झाला होता. फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याच्या कानाखाली मारली होती. 25 एप्रिल, 2008 रोजी मोहालीमध्ये किंग्स इलेवन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर श्रीसंत रडत असल्याचे दिसले. भज्जीने श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर भज्जीला 11 सामन्यासाठी बंदी लावण्यात आली होती.
5- ललित मोदीवर अजीवन बंदी
आयपीएलचा प्लॅन ललित मोदी यांचा आहे. ललित मोदी यांनीच आयपीएलच्या लीगची सुरुवात केली होती. पण 2010 मध्ये त्यांच्यावर पैशांचा गैरव्यवहार करण्याचा आरोप होता. त्यानंतर ललित मोदी यांना बीसीसीआयने निलंबीत केले. त्यानंतर तपासानंतर त्यांच्यावर अजीवन बंदी घालण्यात आली.