एक्स्प्लोर

IPL 2023 : धोनी अन् जड्डूत वादाची ठिणगी? जाडेजाची पत्नी रावीबाच्या ट्वीटनं CSK फॅन्स टेन्शनमध्ये

IPL 2023 : धोनी आणि जडेजा यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर या वादात जडेजाच्या पत्नीचीही एन्ट्री झाली आहे.

Dhoni vs Jadeja : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) वादात सापडल्याचं बोललं जात आहे. जडेजाने केलेलं एका ट्विटमुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आला आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यानंतर धोनी आणि जडेजाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला. या व्हिडीओमध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांशी वाद घालताना दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 

धोनी आणि जडेजामधील वाद चिघळला? 

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता जडेजानं केलेलं ट्विट या वादाशी जोडलं जात आहे. जडेजानं हे ट्विट धोनी आणि त्याच्यातील वादामुळे केलं असल्याचं बोललं जात आहे. जडेजाच्या या ट्विटचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या ट्विटवर जडेजाला त्याची पत्नी रिवाबा हिचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे धोनी आणि जडेजाच्या वादात त्याची पत्नी रिवाबा हीचीही एन्ट्री झाली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ :

नेमका वाद कशावरून?

सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2023 मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विराट विजयासह चेन्नई संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं. दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात जडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. जडेजाची अत्यंत खराब कामगिरी करत चार षटकांच्या गोलंदाजीत 50 हून अधिक धावा दिल्या. धोनी आणि जडेजा यांच्यात यावरून वाद झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

रविंद्रची पत्नी रावीबाचं ट्विट चर्चेत

इतकंच नाही, तर आता हा वाद अधिकच चिघळला असल्याचंही बोललं जात आहे. जडेजाने नुकतच एक ट्विट करत लिहिलं आहे की, "तुमचं कर्म तुमच्याकडे परत येतं. आज किंवा उद्या. पण ते येणार हे निश्चित आहे.''

वादात जडेजाच्या पत्नीची एन्ट्री

मीडिया रिपोर्टनुसार, रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जडेजाच्या पत्नीनं त्याचं समर्थन केलं आहे. रिवाबाने ट्विट करत लिहिलं आहे की, "तुम्ही तुमचा मार्ग अवलंबला पाहिजे."

याआधीही जडेजाचं ट्वीट वादात

मात्र, रविंद्र जडेजाचे ट्वीट वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी चेन्नई संघ आणि रविंद्र जडेजा यांच्यातील संबंध बिघडले होते. रविंद्र जडेजाला हंगामात मधेच कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं. यानंतर जडेजाने सोशल मीडिया हँडलवरून चेन्नई संघासंबंधित सर्व पोस्ट हटवल्या होत्या.

आयपीएलच्या लिलावापूर्वी रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्स सोडणार असा अंदाज बांधला जात होता. पण, तसे झाले नाही आणि जडेजा या वर्षीही चेन्नई संघाकडून खेळताना दिसत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 : प्रेक्षक मी आऊट होण्याची आतुरतेनं वाट पाहतात, कारण...; रवींद्र जाडेजानं व्यक्त केली खंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Rahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Embed widget