एक्स्प्लोर

पंजाब दिल्लीचा अडथळा दूर करणार का? वॉर्नरने नाणेफेक जिंकली, पाहा प्लेईंग 11

DC vs PBKS, IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

DC vs PBKS, IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.  दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. पंजाबला प्लेऑफच्या आशा अद्याप जिवंत आहेत. पंजाब दिल्लीचा अडथळा दूर करुन प्लेऑफच्या दिशेने आगाकूच करणार का? याकडे लक्ष लागलेय. 

पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषि धवन, राहुल चाहर, अर्शदीप सिंह

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिले रुसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार

प्लेऑफमध्ये स्थान कायम राखण्यासाठी पंजाब किंग्स (Punjab Kings) संघांसाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. तर दिल्ली (Delhi Capitals) संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर गेल्यामुळे संघाकडे आता हरण्यासाठी काही शिल्लक नाही, पण पंजाबचा प्लेऑफपर्यंतचा मार्ग खडतर करण्याची संधी दिल्ली संघाकडे आहे. त्यामुळे दिल्ली पंजाबला पुरेपुर टक्कर देण्याचा प्रयत्न करेल.

आयपीएल गुणतालिकेमध्ये पंजाब किंग्स संघ आठव्या स्थानावर आहे. संघाकडे दहा गुण आहेत. पंजाब संघाने आतापर्यंतच्या 11 सामन्यांपैकी पाच सामने जिंकले तर सहा सामने गमावले आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 11 पैकी फक्त चार सामने जिंकता आले असून सात सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

DC vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्स (PBKS) संघ एकूण तीस सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघाची परिस्थिती समान आहे. दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघानी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्या दिल्ली आणि पंजाब या दोन संघांपैकी कोणता संघ वरचढ ठरणार हे पाहावं लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget