WPL 2023 Live Update : मुंबईचा सात विकेटने विजय, दिल्लीचा पराभव
DC-W vs MI-W Final LIVE : मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे.
LIVE
Background
DC-W vs MI-W Final WPL 2023 LIVE: महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा यंदाचा हा पहिलाच हंगाम असून आज स्पर्धेचा विजेता कोण हे स्पष्ट होणार आहे. आज (26 मार्च) अखेरचा म्हणजेच फायनलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) असा खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचा विचार केल्यास दोघांनी अखेपर्यंत टेबल टेबल टॉपर राहण्याची कमाल केली. दोघांनी देखील प्रत्येकी 8-8 सामने खेळले असून दोघांनी देखील 6-6 सामने जिंकले असून 2-2 सामने गमावले आहेत. आधी दिल्लीचा संघ फायनलमध्ये पोहोचला ज्यानंतर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरच्या सामन्यात युपी वॉरियर्सला मात देत फायनल गाठली आहे. दोघांनी यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केल्याने एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो..
भारतीय कर्णधारासमोर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे आव्हान
IPL 2008 मध्ये महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जची कमान सांभाळत होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. सध्या हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाची कर्णधार आहे आणि मेन लेनिंग महिला ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार आहे. अशा स्थितीत अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरसमोर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे आव्हान आहे. आतापर्यंत WPL मध्ये हरमनप्रीत कौर आणि मेन लेनिंग यांच्याकडून उत्कृष्ट कर्णधारपद पाहायला मिळाले आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 8 पैकी 6-6 सामने जिंकले. पण चांगल्या नेट रनरेटमुळे, दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर राहिली आणि संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला यूपी वॉरियर्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागला. एलिमिनेटर सामन्यात मुंबईने 72 धावांनी दणदणीत विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाचा सामना कोण जिंकणार हे पाहावे लागेल. दोन्ही संघांमध्ये स्पर्धा आहे, अशा स्थितीत विजेतेपदाचा सामना खूपच रंजक असेल.
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या फायनलच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
मुंबईचा सात विकेटने विजय, दिल्लीचा पराभव
ब्रंटच्या विस्फोटक खेळीच्या बळावर मुंबईने सात विकेटने विजय मिळवला आहे.
मुंबईचा सात विकेटने विजय, दिल्लीचा पराभव
ब्रंटच्या विस्फोटक खेळीच्या बळावर मुंबईने सात विकेटने विजय मिळवला आहे.
विजय मुंबईच्या दृष्टीक्षेपात
ब्रंटच्या विस्फोटक खेळीमुळे सामना मुंबईकडे झुकला आहे.
मुंबईला मोठा धक्का, कर्णधार हरमनप्रीत बाद
मोक्याच्या क्षणी हरमनप्रीत कौरने विकेट फेकली. मुंबई तीन बाद 95 धावा
हरमनप्रीत - ब्रंटची विस्फोटक फलंदाजी
सुरुवातीला दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने डाव सावरला. मुंबई इंडियन्सचा स्कोर दोन बाद 75 धावा झाल्या आहेत.