एक्स्प्लोर

'वेगवान' मलिक!, आता फेकला IPL इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू

Umran Malik, IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या मोसमात अवघ्या 22 वर्षांच्या या युवा गोलंदाजानं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय.

Umran Malik, IPL 2022 : जम्मू काश्मिरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik)  ने दिल्लीविरोधातील सामन्यात वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी केली. उमरान मलिक याने या सामन्यात तब्बल 150 kmph पेक्षाही जास्त वेगानं चेंडू फेकला. दिल्लीविरोधात उमरान मलिक याने वेगाचे सर्व विक्रम जवळपास मोडीत काढले. उमरान मलिक याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू फेकला. तर आयपीएल इतिहासातील हा दुसरा वेगवान चेंडू होता. 

आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज 
1. शॉन टैट – 157.3kmph.
2. उमरान मलिक – 157kmph.
3. एनरिक नॉर्त्जे – 156.2kmph.
4. उमरान मलिक – 156kmph.
5. एनरिक नॉर्त्जे – 155.2kmph

आयपीएल इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या शॉन टैटने (Shaun Tait) सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. शॉन टैचने तब्बल 157.3kmph वेगाने चेंडू टाकला होता. उमरान मलिक याने शुक्रवारी तब्बल  157 kmph च्या वेगाने चेंडू फेकत या विक्रमच्या जवळ पोहचण्याचा कारनामा केलाय. आयपीएलच्या 15 व्या मोसमात अवघ्या 22 वर्षांच्या या युवा गोलंदाजानं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. सुरुवातीला उमरान मलिक अनेकांच्या नजरेत भरला तो त्याच्या भन्नाट वेगामुळे. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाला खास पुरस्कार दिला जातो. सनरायझर्स हैदराबादच्या गेल्या आठ सामन्यात सलग आठ वेळा दीडशे किलोमीटर्सपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करून उमरान मलिकनं हा पुरस्कार पटकावलाय. याच वेगाच्या जोरावर उमरान मलिकनं आतापर्यंत आठ सामन्यात 12 च्या सरासरीनं तब्बल 15 विकेट्स घेतल्या आहेत. गुजरातविरुद्ध 25 धावात 5 विकेट्स ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे

उमरान मलिक याने19 व्या षटकात 153kmph, 145kmph, 154kmph, 157kmph आणि 156 kmph च्या वेगाने गोलंदाजी केली. पण अखेरच्या चेंडूपर्यंत उमरान मलिकला विकेट घेण्यात अपयश आले. उमरान मलिकने चार षटकात सहा वाईडसह 52 धावा खर्च केल्या.  उमरान मलिकच्या चेंडूवर दिल्लीच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. 

आयपीएलनं आजवर अनेक खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, कृणाल पंड्या, शार्दूल ठाकूर याशिवाय अलिकडेच संघात आलेले सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, टी. नटराजन हे सगळे आयपीएलनं दिलेले हिरे आहेत. याच यादीत आता उमरान मलिकचा समावेश होतो का हे पहावं लागेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget