(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: कोलकात्याविरुद्ध चेतन सकारियाला मिळाली संधी, खलील अहमद संघाबाहेर
IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC Vs KKR) यांच्यात आयपीएल 2022 चा 41 वा सामना खेळला जात आहे.
IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC Vs KKR) यांच्यात आयपीएल 2022 चा 41 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. तर, कोलकाता तीन बदलांसह मैदानात उतरणार आहे. आजच्या सामन्यात दिल्लीनं अखेर गेल्या दोन वर्षात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या चेतन सकारियाला (Chetan Sakariya) संधी दिली आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्लीच्या संघानं चेतन सकारियाला 4.20 कोटीत विकत घेतलं. परंतु, दिल्लीकडून त्याला खूप उशीरा संधी मिळाली आहे. कोलकात्याविरुद्ध दिल्लीचा संघ या हंगामातील आठवा सामना खेळणार आहे. खलील अहमदच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं साकारियाला ही संधी मिळाली. तर, मिचेल मार्शही कोरोनावर मात करून प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला आहे. सर्फराज खान ऐवजी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे.
ट्वीट-
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन:
आरोन फिंच, सुनील नरायण, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, बाबा इंद्रजीत (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसल, उमेश यादव, टीम साऊथी, हर्षित राणा.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन:
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया.
हे देखील वाचा-