डेविड वॉर्नरचा विराट विक्रम, आयपीएलमध्ये झाला 'सहा हजारी मनसबदार'
David Warner in IPL : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने राजस्थानविरोधातील सामन्यात आयपीएलमधील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
David Warner in IPL : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने राजस्थानविरोधातील सामन्यात आयपीएलमधील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वॉर्नर याने आयपीएलमध्ये सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. आसा पराक्रम करणारा तो ओव्हरऑल तिसरा खेळाडू आहे. तर पहिला परदेशी खेळाडू आहे. राजस्थानविरोधातील सामन्यापूर्वी त्याला हा माइलस्टोन पार करण्यासाठी 26 धावांची गरज होती. राजस्थानविरोधात तो कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत आहे. त्याने 26 वी धाव घेताच सहा हजार धावांचा पल्ला पार केला. डेविड वॉर्नर याच्याआधी हा पराक्रम विराट कोहली आणि शिखर धवन यांनी केला आहे. विदेशी खेळाडूमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात वॉर्नर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर एबी डिव्हिलिअर्स आणि ख्रिस गेल यांचा क्रमांक लागतो. हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाले आहेत.
डेविड वॉर्नर याने आयपीएलमध्ये 140 च्या स्ट्राइक रेटने आणि 42 च्या सरासरीने सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. वॉर्नर याने 165 डावात सहा हजार धावांचा पल्ला गाठलाय. यादरम्यान तो 22 वेळा नाबाद राहिलाय. तर त्याने 4 शतके आणि 55 अर्धशतके झळकावली आहेत. वॉर्नर याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 575 चौकार आणि 211 षटकार लगावले आहेत. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी विदेशी खेळाडू आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारे 10 फलंदाज कोणते ?
विराट कोहली 6727 धावा
शिखर धवन 6370 धावा
डेविड वॉर्नर 6000 धावा
रोहित शर्मा 5880 धावा
सुरेश रैना 5528 धावा
एबी डिव्हिलिअर्स 5162 धावा
एमएस धोनी 5004 धावा
ख्रिस गेल 4965 धावा
रॉबिन उथप्पा 4952 धावा
दिनेश कार्तिक 4385 धावा
दिल्लीची धुरा वॉर्नरच्या खांद्यावर -
दिल्लीचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला, यामध्ये तो थोडक्यात बचावला होता. तो पुढील सात ते आठ महिने मैदानावर परतू शकत नाही. अशात दिल्ली संघाची धुरा अनुभवी डेविड वॉर्नर याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. पण डेविड वॉर्नर याला आतापर्यंत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दिल्लीचा पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. या दोन्ही सामन्यात डेविड वॉर्नर याची कामगिरीही साधारण राहिली आहे. इतर खेळाडूंकडूनही वॉर्नर याला चांगली साथ मिळत नाही. अशात दिल्लीची कामगिरी सुधारण्यासाठी डेविड वॉर्नर याला ठोस पावले उचलावी लागतील.
David Warner completes 6,000 runs in the IPL.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 8, 2023
The first overseas player to achieve this landmark!
आणखी वाचा :
IPL 2023 : पृथ्वीची हराकिरी सुरुच! सलग तिसऱ्या सामन्यात विकेट फेकली