CSK vs RCB, Match Preview : सुपर संडेच्या पहिल्या सामन्यात गुरु-शिष्य आमने-सामने; चेन्नई की आरसीबी; कोण ठरणार वरचढ?
CSK vs RCB, Head to Head Preview : सुपर संडेच्या पहिल्या सामन्यात गुरु-शिष्य आमने-सामने येणार आहेत. धोनी आणि विराट कोहली आजच्या सामन्यात एकमेकांविरोधात खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे चेन्नई की आरसीबी; कोण वरचढ ठरणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
CSK vs RCB, Head to Head Preview : आयपीएल 2021 चा 19वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये सामना खेळवण्यात येणार आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्याला गुरु आणि शिष्यामधील टक्कर म्हणून पाहिलं जात आहे. आयपीएलमध्ये जेव्हाही दोन्ही संघ एकमेकांविरोधात खेळतात, त्यावेळी सामना अटीतटीचा होतो हे निश्चित...
एकिकडे कॅप्टन कूल एमएस धोनी असणार आहे. तर दुसरीकडे अग्रेसिव्ह विराट कोहली. अशातच हा सामना रोमांचक होणार हे नक्की. दोन्ही संघ यंदाच्या सीझनमध्ये फॉर्मात आहेत. चेन्नईने पहिल्या पराभवानंतर सलग तीन सामने जिंकले आहेत. तसेच आरसीबीचा आतापर्यंत एकाही सामन्यात पराभव झाला नाही. पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला आरसीबीचा संघ आजच्या सामन्यातही आपली विजयी घौडदौड सुरु ठेवण्याच्या प्रयत्न करताना दिसणार आहे. आरसीबीनं चार सामन्यांमध्ये आतापर्यंत सलग चार सामने जिंकले आहेत, तर सीएसकेनं चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत.
CSK vs RCB Head to Head
चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आतापर्यंत 26 सामने खेळवण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईचं पारड नेहमीच जड दिसून आलं आहे. यापैकी 16 सामने चेन्नईनं जिंकले आहेत. तर आरसीबीनं केवळ 9 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघ वरचढ
यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई आणि बंगलोर दोन्ही संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या येण्यानं यंदा आरसीबीच्या फलंदाजांची फळी मजबूत दिसून येत आहे. दरम्यान, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल ओपनिंग, चौथ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल आणि पाचव्या क्रमांकावर एबी डिविलियर्स आरसीबीची ताकद आहेत. त्याचसोबत मोहम्मद सिराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून तो चांगल्या फॉर्मात दिसून येत आहे. तसेच संघात काइल जॅमीसन आणि केन रिचर्डसनच्या रुपात दोन विदेशी गोलंदाज आहेत. त्याचसोबत पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलही संघात धमाकेदार खेळी करताना दिसत आहे.
चेन्नईबाबत बोलायचं झालं तर फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना आणि एमएस धोनी या संघाची ताकद आहे. तसेच रविंद्र जाडेजा आणि सॅम करन यांसारखे ऑलराउंडर खेळाडू संघात संतुलन साधण्याचं काम करतात. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांच्या रुपात प्रतिभावान खेळाडूंचाही संघात समावेश आहे.
आरसीबीचा संभाव्य संघ : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स (विकेटकीपर), काइल जॅमीसन, वॉशिंगटन सुंदर, केन रिचर्डसन/डॅनियल सॅम्स, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल.
चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ : फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), अंबाती रायडू, रविंद्र जाडेजा, सॅम करन, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर आणि लुंगी नगिदी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :