एक्स्प्लोर

CSK vs MI, IPL 2023 Live: चेन्नई आणि मुंबईत रंगतदार लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

CSK vs MI Live Score: आयपीएलमधील ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखल्या जाणारा चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याकडे आज सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LIVE

Key Events
CSK vs MI, IPL 2023 Live: चेन्नई आणि मुंबईत रंगतदार लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

IPL 2023, Match 49, CSK vs MI : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आज, 06 मे रोजी चेन्नईच्या घरच्या मैदानावर पार पडणार आहे. एमए चिदंबरम स्टेडिअमवर (MA Chidambaram Stadium) सामना रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या मोसमात या दोन संघांमध्ये याआधी रंगलेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा पराभव केला होता. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई संघाने मुंबईचा सात विकेट्सने पराभव केला. आयपीएल 2023 मधील 12 व्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज मुंबई संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.

MI vs CSK Match 49 Preview : चेन्नई विरुद्ध मुंबई

मुंबई संघाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून संघ विजयाची हॅटट्रिक मारण्याचा प्रयत्न करेल. मुंबईने मागील सामन्यात पंजाबचा तर त्याआधीच्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे चेन्नई संघ सलग दोन सामन्यात पराभवानंतर आजच्या सामन्यात उतरणार आहे. मुंबई विरुद्धचा सामना जिंकून चेन्नई संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

CSK vs MI Head to Head : कुणाचं पारड जड?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 35 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 35 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 15 सामने जिंकले आहेत. पण यंदाच्या मोसमात याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असून याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

आज आयपीएल 2023 मध्ये एल-क्लासिको सामना

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघाच्या सामन्याला एल-क्लासिको असं म्हटलं जातं. या दोन संघांच्या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. दोन्ही संघ सर्वाधिक वेळा आयपीएल चॅम्पियन असून संघांचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.

एल-क्लासिको म्हणजे काय?

एल-क्लासिको (El Clásico) हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ उत्कृष्ट असा आहे. दोन उत्कृष्ट संघांमधील लढत म्हणून दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याला एल क्लासिको म्हटलं जातं. फुटबॉलमध्ये, बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात, कारण दोन्ही संघ लीगमधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात. कारण, मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक 5 वेळा आयपीएल विजेता आहे. तर, चेन्नई संघही 4 वेळा आयपीएल विजेता ठरला आहे. 

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

IPL 2023, CSK vs MI : कधी आणि कुठे होणार सामना?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना 6 मे रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023, MI vs CSK Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

19:02 PM (IST)  •  06 May 2023

चेन्नईचा मुंबईवर विजय

चेन्नईचा मुंबईवर सहा विकेटने विजय

18:55 PM (IST)  •  06 May 2023

चेन्नईला चौथा धक्का

कॉनवेच्या रपाने चेन्नईला चौथा धक्का बसला

18:32 PM (IST)  •  06 May 2023

चेन्नईला तिसरा धक्का

चेन्नईला तिसरा धक्का बसलाय.. स्टब्सने रायडूला बाद केले

18:14 PM (IST)  •  06 May 2023

चेन्नईला दुसरा धक्का

अजिंक्य रहाणेच्या रुपाने चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे. पीयूष चावलाने रहाणेला बाद केले

17:50 PM (IST)  •  06 May 2023

चेन्नईला पहिला धक्का, पीयूष चावलाने घेतली विकेट

चेन्नईला पहिला धक्का, पीयूष चावलाने घेतली विकेट... ऋतुराज गायकवाड ३० धावांवर बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget