एक्स्प्लोर

CSK vs LSG : आयुष बडोनीचे दमदार अर्धशतक, सामन्यात पावसाचा व्यत्यय; चेन्नईला विजयासाठी 127 धावांचे आव्हान

CSK vs LSG, IPL 2023 : लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आलाय.

CSK vs LSG, IPL 2023 : लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आलाय. पावसामुळे सामन्याला जवळपसा तासभर विलंब झाला आहे. पावसामुळे चेन्नईला 19 षटकात 127 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. आयुष बडोनीच्या अर्धशतकाच्या बळावर लखनौने 19.2 षटकात सात बाद 125 धावा केल्या होत्या. आयुष बडोनी याने 33 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. 

पावसाच्या व्यत्यानंतर सामना सुरु झाल्यास डकवर्थ लुईस नियमांनुसार चेन्नईला आव्हान दिले जाईल. 19 षटकांचा सामना झाल्यास चेन्नईला विजयासाठी 127 धावांचे आव्हान असेल. तर 18 षटकांचा सामना झाल्यास चेन्नईला 122 धावांचे आव्हान असेल. 10 षटकांचा सामना झाल्यास चेन्नईला 76 धावा कराव्या लागतील. पाच षटकांचा सामना झाल्यास चेन्नईला विजयासाठी 42 धावांचे आव्हान असेल. 

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी धोनीचा निर्णय सार्थ ठरवत लखनौच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. लखनौला पहिला धक्का 18 धावांवर बसला. काइल मेयर्स याला 14 धावांवर मोईन अली याने तंबूत पाठवले. काइल मेयर्स याने 17 चेंडूत 14 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. मेयर्सनंतर मनन वोहराही लगेच तंबूत परतला. वोहरा याने 11 चेंडूत एका चौकारासह 10 धावांचे योगदान दिले. सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर लागोपाठ विकेट पडल्या. कृणाल पांड्याला खातेही उघडता आले नाही. तर करण शर्मा 16 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. रविंद्र जाडेजा याने मार्कस स्टॉयनिसला बाद करत लखनौच्या अडचणी आणखी वाढवल्या. मार्कस स्टॉयनिस सहा धावांवर माघारी परतला. आयुष बडोनी याने अखेरपर्यंत किल्ला लढवला. आयुष बडोनी याने 33 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. बडोनी याने आपल्या या खेळीत 4 षटकार आणि दोन चौकार लगवाले. पाऊस येण्यापूर्वी आयुष बडोनी याने दमदार फलंदाजी करत लखनौचा डाव सावरला.

स्टॉयनिस बाद झाल्यानंतर लखनौचा डाव लवकर आटोपणार असेच म्हटले जात होते. पण युवा आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी लखनौच्या डावाला आकार दिला. निकोलस पूरन आणि बदोनी यांनी सहाव्या विकेटसाठी 48 चेंडूत 59 धावा जोडल्या. लखनौची ही सर्वात मोठी भागिदारी होय. पथीराना याने निकोलस पूरन यलाला बाद करत ही जोडी फोडली. पूरन याने 31 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. विस्फोटक निकोलस पूरन याला एकही चौकार आणि एकही षटकार मारता आला नाही. पूरन बाद झाल्यानंतर सामन्याची सर्व सुत्रे आयुष बडोनी याने आपल्या हातात घेतली. बडोनी याने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. बडोनीच्या अर्धशतकाच्या बळावर लखनौचा संघ 120 ची धावसंख्या पार करु शकला. 

चेन्नईची भेदक फिरकी - 

चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत लखनौच्या फलंदाजांना तंबूत धाडले. रविंद्र जाडेजा, मोईन अली आणि महिश तिक्ष्णा यांनी पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. महिश तिक्ष्णा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा याने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. मोईन अली याने चार षटकात 13 धावा खर्च केल्या. महिश तिक्ष्णा याने चार षटकात 37 धावा दिल्या. रविंद्र जाडेजा याने तीन षटकात 11 धावा दिल्या. दीपक चाहर याने चार षटकात 41 धावा दिल्या. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget