गौतम गंभीर की धोनी, कोण बाजी मारणार? CSK अन् KKR ची संभाव्य प्लेईंग 11
KKR vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स संघामध्ये आज (8 एप्रिल 2024) आज आमनासामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता एमए चिदंबरम स्टेडियम स्टेडियमवर काटें की टक्कर होण्याची शक्यता आहे.
IPL 2024 KKR vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स संघामध्ये आज (8 एप्रिल 2024) आज आमनासामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता एमए चिदंबरम स्टेडियम स्टेडियमवर काटें की टक्कर होण्याची शक्यता आहे. कोलकात्याचा विजयरथ रोखण्याचं आव्हान चेन्नईपुढे असेल. चेन्नईला मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. चेन्नईला चार सामन्यात दोन पराभव आणि दोन विजय मिळाले आहेत. तर कोलकाता संघाने आपल्या तिन्ही सामन्यात बाजी मारली आहे. कोलकाता संघ स्पर्धेत आतापर्यंत अजेय आहे. आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा असतील.
चेन्नई आणि कोलकाता विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघ संतुलित आणि तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी संतुलित संघाची निवड करणतीलच. पाहूयात चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील संभाव्य प्लेईंग 11 आणि पिच रिपोर्ट काय म्हणतेय
पिच रिपोर्ट
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम स्टेडियमवर नेहमीच फिरकी गोलंदाजांचा दबदबा असल्याचं आकडे सांगतात. पण यंदाच्या वर्षातील खेळपट्टी वेगळी असल्याचं दिसते. यंदाच्या हंगामात या मैदानावर दोन सामने झाले आहेत, त्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली, तर फिरकी गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. या खेळपट्टीवर फलंदाजांचा दबदबा दिसला. चेन्नईने या मैदानावर 200 धावांचा पल्ला आरामात पार केला होता. त्याशिवाय आरसीबीने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आरामात केला होता. आजच्या सामन्यातही फलंदाजांचा दबदबा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Next up on Guru Gambhir's task list: 🗒️
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 8, 2024
Conquer Mission Chepauk 💪 pic.twitter.com/RiBWsbVLWh
मॅच प्रिडिक्शन
यंदाच्या हंगामात कोलकात्याचा संघ संतुलित आणि आक्रमक दिसतोय. कोलकात्यानं पहिल्या तिन्ही सामन्यात सहज विजय मिळवला आहे. हैदराबाद, आरसीबी आणि दिल्ली यांचा केकेआरने सहज पराभव केला. आजच्या सामन्यात केकेआर फेव्हरेट असल्याचं दिसतेय. पण शेवटी क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे.
चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेईंग 11
रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डेरिल मिचेल, रवींद्र जड़ेजा, समीर रिजवी/मिचेल सेंटनर, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.
इम्पॅक्ट प्लेयर- मुकेश चौधरी
कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11
सुनील नरेन, फिल साल्ट, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर- सुयश शर्मा.