CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीच्या संघाचा दणदणीत विजय

CSK vs GT IPL 2023 Final LIVE Score: आज आयपीएल 2023 चा महामुकाबला (IPL 2023 Final) चेन्नई आणि गुजरात (GT vs CSK) यांच्यात रंगणार असून या स्पर्धेचा महाविजेता आज ठरणार आहे

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 30 May 2023 01:37 AM
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नई यंदाचा महाविजेता

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नई यंदाचा महाविजेता

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला एका चेंडूत चार धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला एका चेंडूत चार धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 2 चेंडूत 10 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 2 चेंडूत 10 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 3 चेंडूत 11 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 3 चेंडूत 11 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 4 चेंडूत 12 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 4 चेंडूत 12 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 5 चेंडूत 13 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 5 चेंडूत 13 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 6 चेंडूत 13 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 6 चेंडूत 13 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 8 चेंडूत 16 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 8 चेंडूत 16 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 10 चेंडूत 20 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 10 चेंडूत 20 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 12 चेंडूत 21 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 12 चेंडूत 21 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईची धावसंख्या 150 धावा, पाच गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईची धावसंख्या 150 धावा, पाच गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 13 चेंडूत 22 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 13 चेंडूत 22 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : धोनी पहिल्याच चेंडूवर बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : धोनी पहिल्याच चेंडूवर बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 14 चेंडूत 22 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 14 चेंडूत 22 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : कर्णधार धोनी मैदानात

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : कर्णधार धोनी मैदानात

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला चौथा धक्का, रायडू बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला चौथा धक्का, रायडू बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 15 चेंडूत 22 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 15 चेंडूत 22 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 18 चेंडूत 38 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 18 चेंडूत 38 धावांची गरज

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : बारा षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 133 धावा, तीन गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : बारा षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 133 धावा, तीन गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईची धावसंख्या 117 धावा, 3 गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईची धावसंख्या 117 धावा, 3 गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : अकराव्या षटकात चेन्नईला तिसरा धक्का, रहाणे बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : अकराव्या षटकात चेन्नईला तिसरा धक्का, रहाणे बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : दहाव्या षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 112 धावा, दोन गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : दहाव्या षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 112 धावा, दोन गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : आठ षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 94 धावा, दोन गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : आठ षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 94 धावा, दोन गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : नूर अहमदकडून एकाच षटकात ऋतुराज आणि कॉनवे बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : गुजरातच्या नूर अहमदने एकाच षटकात घेतली ऋतुराज आणि कॉनवेची विकेट

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला दुसरा धक्का, कॉनवे बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नईला दुसरा धक्का, कॉनवे बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईची धावसंख्या 74 धावांवर एक गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईची धावसंख्या 74 धावांवर एक गडी बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : सहा षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 72 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : सहा षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 72 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : पाच षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 58 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : पाच षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 58 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चार षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 52 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चार षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 52 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : तीन षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 35 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : तीन षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 35 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : दोन षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 24 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : दोन षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 24 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : पहिल्या षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 10 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : पहिल्या षटकानंतर चेन्नईची धावसंख्या 10 वर

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईच्या फलंदाजीला पुन्हा सुरुवात

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईच्या फलंदाजीला पुन्हा सुरुवात

चेन्नईला विजयासाठी 171 धावांचे आव्हान

चेन्नई आणि गुजरातच्या सामन्यात आजही पावसाने ख्वाडा घातला. त्यामुळे जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. 12.10 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पण डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आले आहे. 


डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. प्रत्येक गोलंदाजाला तीन षटकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर पावरप्ले चार षटकांचा असेल. चेन्नईने 0.3 षटकात 4 धावा केल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 14.3 षटकात चेन्नईला विजयाला 167 धावा करायच्या आहेत. 

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 15 षटकात 171 धावांचं लक्ष्य

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : चेन्नईला 15 षटकात 171 धावांचं लक्ष्य

4 षटकांचा पावरप्ले, प्रत्येक गोलंदाजाला तीन षटकांची मर्यादा


15 षटकांचा सामना होणार आहे. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचे आव्हान आहे. चेन्नईने 0.3 षटकात चार दावा केल्या आहेत. त्यामुळे चेन्नईला 14.3 षटकात 167 धावा करायच्या आहेत. पावरप्ले चार षटकाचा असेल. प्रत्येक गोलंदाजाला तीन षटकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.  



 





 






12.10 वाजता सामन्याला होणार सुरुवात

12.10 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे. 15 षटकांचा सामना असेल. डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला विजयासाठी 171 धावांचे आव्हान देण्यात आलेय आहे. 

खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी पंच पुन्हा मैदानावर

खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी पंच पुन्हा मैदानावर आले आहेत. 

किती षटकांचा सामना असेल ?

पावसानंतर सामना सुरु झाल्यास षटके किती असणार ?





11.45 पासून षटके कमी करण्यास सुरुवात

11.45 पर्यंत सामना सुरु झाला नाही तर षटके कमी करण्यास सुरुवात होणार 





11.30 वाजता पंच पुन्हा खेळपट्टीची पाहणी करणार

11.30 वाजता पंच पुन्हा खेळपट्टीची पाहणी करणार आहेत.

खेळपट्टीची पाहणी कऱण्याची पंच मैदानात

खेळपट्टीची पाहणी कऱण्याची पंच मैदानात पोहचले आहेत. थोड्याच वेळात घेणार निर्णय

थोड्याच वेळात पंच पाहणी करणार

10.45 वाजता पंच मैदानाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते सामना किती षटकाचा घ्यायचा याबाबत निर्णय घेतील.

पावसाची विश्रांती

पावसाची विश्रांती... थोड्याच वेळात सामन्याला होणार सुरुवात

फायनलमध्ये पुन्हा पावसाचा ख्वाडा

अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. 





चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान

IPL 2023 Final, GT vs CSK: साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे.

गुजरताला तिसरा धक्का

गुजरताला तिसरा धक्का... 96 धावांवर साई सुदर्शन बाद

गुजरताच्या 200 धावा

गुजरताच्या 200 धावा

साई सुदर्शनचे दमदार अर्धशतक

साई सुदर्शनचे दमदार अर्धशतक.. अवघ्या 33 चेंडूत झळकावले अर्धशतक

गुजरातला दुसरा धक्का

गुजरातला दुसरा धक्का.. अर्धशतकानंतर वृद्धीमान साहा बाद

गुजरातला पहिला धक्का

गुजरातला पहिला धक्का बसला आहे. भन्नाट फॉर्मत असलेला शुभमन गिल 39 धावांवर बाद झालय

गुजरातची धुवांधार सुरुवात

गुजरातची धुवांधार सुरुवात झाली आहे. गिल आणि साहा यांनी सहा षटकात 62 धावा जोडल्या आहेत. शुभमन गिल 36 तर साहा 26 धावांवर खेळत आहे. 

शुभमन गिल याला जीवनदान

शुभमन गिल याला फायनलमध्ये जीवनदान मिळाले आहे. तीन धावांवर असताना गिल याचा सोपा झेल दीपक चहर याच्याकडून सुटला. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर उडालेला झेल चाहरकडून सुटला. मुंबई इंडियन्सविरोधातही गिल याला जीवनदान मिळाले होते, त्यानंतर त्याने शतक झळकावले होते. 

साहा-गिलची दमदार सुरुवात

साहा-गिलची दमदार सुरुवात... 4 षटकात 40 धावांचा पाऊस

चेन्नई सुपर किंग्स

- ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा.


 

गुजरात टायटन्स -

 वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.


 

हार्दिक पांड्याची फलंदाजी

IPL 2023 : आयपीएलच्या महामुकाबल्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकली आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअवर हार्दिक पांड्याचा गुजरात संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी संघात कोणताही बदल केला नाही. दोन्ही संघाने मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. 


हार्दिक पांड्या आणि गुजरातचा संघ दुसऱ्या आयपीएल जेतेपदासाठी मैदानात उतरले. तर एम एस धोनी आणि चेन्नई पाचव्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. चेन्नईने चषक उंचावल्यास मुंबईची बरोबरी होईल. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. तर चेन्नईने चार वेळा जेतेपद पटकावलेय. हार्दिक पांड्या याच्या गुजरात संघाने दुसऱ्यांदा चषक जिंकल्यास चेन्नई आणि मुंबई संघाची बरोबरी करेल. मुंबई आणि चेन्नई यांनी प्रत्येकी दोन दोन वेळा चषक उंचावलाय. 

धोनीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

धोनीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

क्लोजिंग सेरेमनीला सुरुवात

क्लोजिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे.  





अमहमदाबादमध्ये पावसाची विश्रांती 

अमहमदाबादमध्ये रविवारी मध्य रात्रीपासून पावसाची विश्रांती .. गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामना होणार

धोनीचा 250 वा सामना

कॅप्टन कूल धोनीचा 250 वा आयपीएल सामना 





रविवारी पावसामुळे खेळखंडोबा, आजतरी सामना होणार का?

आयपीएलच्या सोळाव्या मोसमातील अंतिम सामना  रविवारी होणार होता. पण पावसामुळे होऊ शकला नाही. पाऊस थांबेल म्हणून पंच, चाहत्यांसह साऱ्यांनी बराच वेळ वाट पाहिली पण पाऊस थांबला नाही. त्यामुळे अखेर रविवारचा सामना रद्द करण्यात आला. आता आज, राखीव दिवशी हा सामना खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे, अहमदाबादमध्ये आज हवामान साफ आहे, पावसाची शक्यता नाही. येथील वातावरण ढगाळ असेल पण पावसाची शक्यता नाही. 


रविवारी IPLच्या अंतिम सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याला ब्रेक लागला. सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पण प्रेक्षकांचा प्रचंड हिरमोड झाला. मैदानात आलेल्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेकांनी परतीची तिकीट बूक केली होती.. काही जणांनी उघड्यावर रात्र काढली. बस स्टॉप, रेल्वे स्टेशनवर चाहत्यांची गर्दी झाली होती. रात्रभर चाहते स्टेशनवर झोपले. आता चाहते पुन्हा एकदा नव्या दमाने स्टेडिअमवर आपल्या आवडत्या खेळाडूला पाहायला परतले आहेत. स्टेडिअवर मोठी गर्दी झाली आहे. 

Man of the Match winners in IPL finals

 




























































































वर्षआयपीएल फायनलसामनावीर Man of the Match
2008राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्सयुसूफ पठाण (RR) - 56 (39), 3/22
2009डेक्कन चार्जस vs आरसीबीअनिल कुंबळे (RCB) - 4/16
2010चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्ससुरेश रैना (CSK) - 57* (35), 1/21
2011चेन्नई सुपर किंग्स vs आरसीबीमुरली विजय (CSK) - 95 (52)
2012केकेआर vs चेन्नई सुपर किंग्समनविंदर बिसला  (KKR) - 89 (48)
2013मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्सकायरन पोलार्ड (MI) - 60* (32)
2014केकेआर vs पंजाब किंग्समनिष पांडे (KKR) - 94 (50)
2015मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मा (MI) - 50 (26)
2016सनरायजर्स हैदराबाद vs आरसीबीबेन कटिंग (SRH) - 39* (15)
2017मुंबई इंडियन्स vs रायझिंग पुणे सुपरजायंट्सकृणाल पांड्या (MI) - 47 (38)
2018चेन्नई सुपर किंग्स vs सनरायजर्स हैदराबादशेन वॉटसन (CSK) - 117* (57)
2019मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्सजसप्रीत बुमराह (MI) - 2/14
2020मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्सट्रेंट बोल्ट (MI) - 3/30
2021चेन्नई सुपर किंग्स vs केकेआरफाफ डु प्लेसिस (CSK) - 86 (59)
2022गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्सहार्दिक पांड्या (GT) - 34 (30), 3/17
2023*चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटन्सTBD



 
फायनलमध्ये पहिला सामनावीर पुरस्कार कुणी पटकावला ?

आयपीएल फायनलचा पहिला सामनावीर पुरस्कार युसूफ पठाण याने पटकावला आहे.  आयपीएलच्या पहिल्या हंगामात 2008 मध्ये राजस्थान आणि चेन्नई यांच्यात फायनलची लढथ झाली होती.  या सामन्यात राजस्थानच्या युसूफ पठाण याने अष्टपैलू खेळी केली होती. युसूफ पठाण याने फलंदाजी 56 धावांचे योगदान दिले होते. तर गोलंदाजीत तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. युसूफ पठाण याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पहिल्या आयपीएल चषकावर नाव कोरले होते. 

Most dismissals by a wicketkeeper :

विकेटच्या मागे एमएस धोनीने फायनलमध्ये सात जणांना बाद केलेय.  

Most catches :

Most catches : सुरेश रैना याने सर्वाधिक सहा झेल घेतले आहेत. 

Best Individual figures :

Best Individual figures : आयपीएल फायनलमध्ये सर्वात चांगल्या गोंलदाजीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. 2009 मध्ये अनिल कुंबळे याने डेक्कन चार्सज विरोधात 16 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या होत्या.  

Most wickets by a bowler :

Most wickets by a bowler : आयपीएल फायनलमध्ये डेवेन ब्रॉव्हो याने सर्वाधिक 10 विकेट घेतल्या आहेत. 

Centuries

Centuries : आयपीएलच्या फायनलमध्ये आतापर्यंत फक्त दोन शतकांची नोंद आहे. 

Half-centuries :

Half-centuries : 2008 पासून आतापर्यंत आयपीएल फायनलमध्ये 26 अर्धशतके झाली आहेत.  

Highest individual score by a batter :

Highest individual score by a batter : आयपीएल फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या शेन वॉटसनच्या नावावर आहे. शेन वॉटसन याने 2018 मध्ये हैदराबादविरोधात नाबाद 117 धावांची खेळी केली होती. 

Most runs by a batter :

Most runs by a batter :  आयपीएलच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात आघाडीवर चेन्नईच्या सुरेश रैनाचे नाव आहे. सुरेश रैनाने आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. सुरेश रैना याने आठ आयपीएल फायनलमध्ये 36 च्या सरासरीने आणि 150 च्या स्ट्राईक रेटने 249 धावा काढल्या आहेत. यादरम्यान रैनाची सर्वोच्च धावसंख्या 73 इतकी राहिली आहे. तर सुरेश रैना याने आयपीएल फायनलमध्ये दोन अर्धशतके झळकावली आहेत. 

Lowest team total :

Lowest team total : आयपीएलच्या फायनलमधील निचांकी धावसंख्या चेन्नईच्या नावावर आहे. 2013 मध्ये चेन्नईच्या संघाने मुंबईविरोधात नऊ विकेटच्या मोबदल्यात 125 धावा केल्या होत्या. या सामन्यात मुंबईने बाजी मारली होती.. मुंबईचा संघ पहिल्यांदा आयपीएलचा विजेता बनला होता. 

Highest team total:

Highest team total: आयपीएल फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या सनरायजर्स हैदराबाद संघाच्या (Sunrisers Hyderabad) नावावर आहे.  2016 फायनलमध्ये आरसीबीविरोधात हैदराबादने सात विकेटच्या मोबदल्यात 208 धावा चोपल्या होत्या. हैदराबादच्या संघाने चषक उंचावला होता.

अहमदाबादमधील हवमान स्वच्छ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याआधी नुकसान

आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी टीम इंडियाची तयारी सुरु झाली आहे. बहुतेक भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले असून त्यांनी चॅम्पियनशीपसाठी तयारी सुरु केली आहे. शुभमन गिल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि अजिंक्य रहाणे हे सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये टीम इंडियाचे सदस्य आहेत. पण, आयपीएचा अंतिम सामना अद्याप शिल्लक असल्यामुळे हे चार खेळाडू अजून इंग्लंडला पोहोचू शकलेले नाहीत. यामुळे टीम इंडियाचं नुकसान होणार आहे.

IPL 2023 Final : आयपीएलमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याआधी नुकसान

IPL 2023 Reserve Day, WTC Final : अहमदाबादमध्ये रविवारी पडलेल्या पावसामुळे आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज, 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. आयपीएलचा महाअंतिम सामना आज राखीव दिवशी म्हणजेच 'रिझर्व्ह डे' (Reserve Day) खेळवला जाईल. दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना लांबल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : आयपीएल 2023 चा महामुकाबला

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier league) यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामना आज, 29 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. आजच्या सामन्यानंतर यंदाच्या मोसमातील विजेता मिळणार आहे. 

IPL 2023 : गिल, शमी, जडेजा आणि रहाणे अंतिम सामन्याला मुकणार?, सोशल मीडियावरील 'ते' ट्वीट व्हायरल

IPL 2023 Final Match : अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे आयपीएल 2023 चा (IPL 2023) अंतिम सामना रविवारी स्थगित करण्यात आला. आता चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज 29 मे रोजी चेन्नई आणि गुजरात यांच्यातील अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. शुभमन गिल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू आजच्या सामन्याला मुकणार आहेत, अशा आशयाचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : 59 दिवस आणि 74 सामने, आज ठरणार महाविजेता

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या सोळाव्या मोसमात फक्त एकमेव सामना शिल्लक आहे. आयपीएल 2023 चा हा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील हा 74 वा सामना असेल. 31 मार्च रोजी धूमधडाक्यात या स्पर्धेला सुरुवात झाली. 59 दिवस आणि 73 सामन्यानंतर आज आयपीएल 2023 मधील विजेता मिळणार आहे. चार वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आज रणसंग्रामासाठी सज्ज झाले आहेत. 

IPL 2023 Final : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच राखीव दिवशी रंगणार अंतिम सामना

IPL 2023 Final CSK vs GT : आयपीएल 2023 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार होता. रविवारी पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे. सोमवारी राखीव दिवशी आता आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांच असं घडत आहे की, आयपीएलचा अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

IPL 2023 Final : चेन्नई उपविजेता? अहमदाबादच्या मैदानावरील फोटो व्हायरल

CSK vs GT, IPL 2023 Final : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठ्या स्क्रीनवर चेन्नई (CSK) ला आयपीएल 2023 चे उपविजेता दाखवला जाणारा फोटो सध्या व्हायरल होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

CSK vs GT : अंतिम सामन्यावर पुन्हा पावसाचं सावट! सोमवारीही सामना रद्द झाल्यास विजेता कोण ठरणार?

CSK vs GT, IPL 2023 Final Match : रविवारी झालेल्या पावसामुळे अहमदाबादमधील (Ahmedabad Rain) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील आयपीएल 2023 चा अंतिम सामना (IPL 2023 Final ) होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना आज, सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार  रविवारी पावसानं प्रेक्षकांची निराशा केली. आज 29 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट आहे. सोमवारीही आयपीएल 2023 चा अंतिम सामना होऊ शकला नाही. तर, पुढे काय होणार... कोणता संघ महाविजेता ठरणार जाणून घ्या


 

IPL 2023 : गिल, शमी, जडेजा आणि रहाणे अंतिम सामन्याला मुकणार?, सोशल मीडियावरील 'ते' ट्विट व्हायरल

CSK vs GT, IPL 2023 : IPL 2023 Final Match : अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे आयपीएल 2023 चा (IPL 2023) अंतिम सामना रविवारी स्थगित करण्यात आला. आता चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यांती सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज 29 मे रोजी चेन्नई आणि गुजरात यांच्यातील अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. शुभमन गिल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू आजच्या सामन्याला मुकणार आहेत, अशा आशयाचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नई आणि गुजरात, कोण ठरणार स्पर्धेचा महाविजेता?

CSK vs GT IPL 2023 Final : आज 29 मे रोजी आयपीएल 2023 चा महामुकाबला (IPL 2023 Final) चेन्नई आणि गुजरात (GT vs CSK) यांच्यात रंगणार असून या स्पर्धेचा महाविजेता आज ठरणार आहे. 28  मे रोजी अंतिम सामना स्थगित झाला होता.

IPL 2023 Final : आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला

IPL 2023 Final : आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला, पावसामुळे रविवारचा सामना सोमवारी; चेन्नई की गुजरात कोण ठरणार चॅम्पियन

सोमवारी रंगणार आयपीएलची फायनल

IPL Final 2023 : आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण?  धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. पण अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे आज सामना झाला नाही. जवळपास चार ते पाच तास इथं जोरदार पाऊस पडला. पंचांनी रात्री 11 वाजेपर्यंत सामना सुरु होण्याची वाट पाहिली.. पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झालाय. आता राखीव दिवशी, म्हणजेच सोमवारी आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. पण सोमवारी पावसाने उसंत घेतली नाही, तर गुजरातला जेतेपद देण्यात येणार आहे. कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. 

आजचा दिवस संपला...

पावसामुळे आयपीएल फायनल सोमवारी होणार आहे. 

ग्राऊंड्समनची कसरत

स्टेडिअम रिकामे, प्रेक्षक माघारी परतले

खूशखबर.... पावसाने विश्रांती घेतली... कव्हर्स काढले

खूशखबर.... पावसाने विश्रांती घेतली... कव्हर्स काढलेय... आऊटफिल्ड सुखवण्याचे काम सुरु

पावसाने विश्रांती घेतली

पावसाने विश्रांती घेतली... 

पावसाला पुन्हा सुरुवात

नरेंद्र मोदी स्टेडिअवर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. 





अखेर पाऊस थांबला

अखेर पाऊस थांबला

CSK Vs GT in IPL 2023 Final:

 


9.56pm - पर्यंत सामना सुरु झाला तर 20-20 षटकांचा सामना होईल. 


11.56pm - पाच षटकांचा सामान होईल


आज सामना झाला नाही तर राखीव दिवशी  (29 मे) सामना होईल.

आजची रात्र आयपीएल फायनलची?

अहमदाबादच्या पावसाचा आयपीएल फायनलला तडाखा बसलाय. फायनल सुरु होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसानं आजच्या दिवसावर पाणी फेरलं तर फायनलसाठी उद्याचा दिवस राखीव आहे. रात्री ९.३५ वाजेपर्यंत खेळ सुरु झाला तर फायनल २०-२० षटकांची होणार आहे. रात्री ९.३५ वाजल्यानंतर खेळ सुरु झाला तर फायनलची षटकं कमी होणार आहेत. रात्री ११.५६ वाजता खेळ सुरु झाला तर फायनल पाच-पाच षटकांची होणार आहे. आज खेळ सुरु झाल्यावर पुन्हा पाऊस आल्यास उर्वरित सामना राखीव दिवशी होईल. 

पावसाचा जोर ओसरला

पावसाचा जोर ओसरला आहे.... थोड्याच वेळान नाणेफेकीबदद्दल माहिती मिळणार

नाणेफेक उशीराने होणार

नाणेफेक उशीराने होणार... अहमदाबादमध्ये धो धो पाऊस

थोड्याच वेळात रंगणार थरार

थोड्याच वेळात रंगणार थरार... नरेंद्र मोदी स्टेडिअवर गर्दी उसळळी

आज थांबतोय.... फायनलनंतर अंबाती रायडू निवृत्त होणार, इमोशनल पोस्ट लिहित केली घोषणा

आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण? धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडू याने निवृत्तीची घोषणा केली आहे.  अंबाती रायडू याने ट्वीट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. 


मुंबई आणि चेन्नई या दोन संघाचा भाग होण्याची संधी मिळाली.  14 हंगाम 204 सामने, 11 प्लेऑफ, 8 फायनल आणि पाच आयपीएल चषके... आज सहावा चषक जिंकू अशी आशा आहे. आज रात्री होणारी सामना माझ्या आयपीएल करिअरचा अखेरचा सामना असेल. सर्वांचे आभार.. अशी इमोशनल पोस्ट रायडूने केली आहे. 

आतापर्यंत कोण कोणत्या संघाने फायनल जिंकली ?

2008 









 


आयपीएलच्या पहिल्या चषकावर राजस्थानने नाव कोरले होते. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न याने राजस्थानला जेतेपद मिळवून दिले होते. चेन्नईचा संघ उपविजेता ठरला होता. राजस्थानने चेन्नईचा तीन विकेट राखून पराभव केला होता. राजस्थान याला त्यानंतर एकदाही चषकावर नाव कोरला आले नाही.  2008 च्या विजेत्या राजस्थान संघात रविंद्र जाडेजा होता. 


2009 


डेक्कन चार्जस संघाने २००९ मध्ये चषकावर नाव कोरले होते. आरसीबीचा सहा धावांनी पराभव करत डेक्कन चार्जस संघाने चषकावर नाव कोरले होते. या संघामध्ये रोहित शर्मा याचा सहाभाग होता. 


2010


चेन्नई संघाने प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव केला होता. 


2011


धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. या हंगामात आरसीबी उपविजेता राहिली. चेन्नईने अंतिम सामन्यात आरसीबीचा ५८ धावांनी विराट पराभव केला होता. 


2012


गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने प्रथमच चषकावर नाव कोरले.  चेन्नईनेच्या लागोपाठ तिसऱ्या विजयाचे स्वप्न केकेआरने मोडले. रोमांचक सामन्यात कोलकात्याने बाजी मारली होती.


2013


रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पहिल्यांदाच चषकावर नाव कोरले. मुंबईने धोनीच्या चेन्नईचा पराभव करत चषक उंचवला. अंतिम सामन्यात १४९ धावांचे आव्हान चेन्नईला गाठता आले नाही. चेन्नईचा संघ १२५ धावांपर्यंत मजल मारु शकला.


2014


गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकात्याने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. पंजाब संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचला होता.. पण फायनलमध्ये त्यांना कोलकात्याचा अडथळा दूर करता आला नाही.  १९९ धावांचे आव्हान कोलकात्याने आरामात पार करत चषक उंचावला. 


2015


चेन्नईचा पराभव करत मुंबईने चषकावर नाव कोरले. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल चेन्नईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईने हा सामना ४१ धावांनी जिंकला.


2016


आरसीबीचा पराभव करत हैदराबादने चषकवर नाव कोरले. हैदराबादची ही दुसरी ट्रॉफी असली तरी सनरायझर्स हैदराबादची ही पहिलीच ट्रॉफी आहे. भन्नाट फॉर्मात असलेल्या विराट कोहली याने या हंगामात चार शतकांच्या मदतीने ९७० धावा चोपल्या होत्या. पण आरसीबीला हैदराबादकडून आठ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 


2017 


मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. पण यावेळी चेन्नई नव्हे रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा पराभव केला. रोमांचक झालेल्या सामन्यात मुंबईने अवघ्या एका धावेने विजय मिळवला. मुंबईविरोधात चेन्नईचा संघ नव्हता.. पण धोनी होता.. धोनी पुणे संघाचा कर्णधार होता. 


2018


2010 आणि 2011 नंतर चेन्नईचा अनेकवेळा फायनलमध्ये पोहचला होता. पण त्यांना जेतेपद मिळवता आले नव्हते. पण २०१८ मध्ये चेन्नईने हैदराबादचा पराभव करत चषकावर नाव कोरले होते. दोन वर्षाच्या बंदीनंतर चेन्नईने दणक्यात पुनरागमन केले होते. २०१८ च्या फायनलमध्ये चेन्नईने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला होता. 


2019


मुंबईने चेन्नईचा पराभव करत चौथ्या चषकावर नाव कोरले. मुंबईने फायनलमध्ये तिसऱ्यांदा चेन्नईचा पारभव केला. रोमांचक सामन्यात मुंबईने चेन्नईचा अवघ्या एका धावेने पराभव केला होता. अखेरच्या चेंडूवर मलिंगाने शार्दूल ठाकूर याला क्लिनबोल्ड करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले. 


2020


मुंबईने पिहिल्यंदाच धोनीशिवाय फायनल जिंकली. मुंबईने पहिल्या चारही चषकावर धोनीच्या संघाचा पारभव करत नाव कोरले होते. २०२० मध्ये पहिल्यांदाच मुंबईने दुसऱ्या संघाचा पराभव करत चषक जिंकला. दिल्लीचा पराभव करत मुंबईने पाचव्यांदा चषकावर नाव कोरले.


2021


धोनीने चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले. फायनलध्ये कोलकात्याचा 27 धावांनी पराभव करत धोनीने जेतेपद जिंकले. 


2022


गुजरात आणि लखनौ या दोन संघाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता. या दोन्ही संघाने पहिल्या झटक्यात प्लेऑफ गाठली. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने चषकावर नाव कोरले.  गुजरातने राजस्थानचा सात विकेटने पराभव करत चषकावर नाव कोरले. 

आयपीएलमधील महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

CSK IPL Records: धोनीच्या चेन्नईचा बोलबाला! CSK चे 5 विक्रम माहित आहेत का ?


गुजरात की चेन्नई कोण मारणार बाजी? 2008 पासून कोणत्या संघाने चषक उंचावला, वाचा एका क्लिकवर


IPL 2023 : चेन्नईच्या कोणत्या किंगची सुपर कामगिरी, पाहा संपूर्ण आकेडावारी एका क्लिकवर


आयपीएलमध्ये चेन्नईच किंग्स, सर्वाधिक फायनल खेळणारा संघ, पाहा CSK ची आतापर्यंतची कामगिरी


GT in IPL 2023: हार्दिकची टोळी दुसऱ्यांदा फायनलमध्ये, टायटन्सपुढे किंग्सचे आव्हान, पाहा गतविजेत्याचा यंदाचा प्रवास


IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, मुंबईला 7 कोटी; पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये? 


पर्पल-ऑरेंज कॅप टायटन्सकडेच, हार्दिकच्या टोळीत कुणाची कामगिरी कशी, वाचा एका क्लिकवर




WTC विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पण IPL विजेत्यापुढे ही रक्कम किरकोळ



चेन्नई विरुद्ध गुजरात हेड टू हेड आकडेवारी

 


गुजरात टायटन्सं संघाचं यंदाचं आयपीएलमधील दुसरं वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने विजेतेपदावर नाव कोरलं. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. यंदाही गुजरात आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले होते. यामध्ये दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने तीन तर चेन्नईने एका सामन्यात विजय मिळवलाय. 

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : गतविजेता गुजरात की 4 वेळा चॅम्पियन चेन्नई, कोण मारणार बाजी?

IPL 2023 Final Match, CSK vs GT : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier league) यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामना आज, 28 मे रोजी खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. आजच्या सामन्यानंतर यंदाच्या मोसमातील विजेता मिळणार आहे. यंदाच्या मोसमात हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमाची सुरुवातही या चेन्नई आणि गुजरात यांच्या लढतीने झाली होती आणि आता शेवटही याच दोघांच्या सामन्याने होणार आहे.

गुजरात आणि चेन्नई तिसऱ्यांदा आमने-सामने

आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईनं गुजरातचा पराभव केला. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) गुजरात टायटन्स (GT) वर मात करत चेन्नई सुपर किंग्स (CSK) अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता.

चेन्नई विरुद्ध गुजरात हेड टू हेड आकडेवारी

गुजरात टायटन्सं संघाचं यंदाचं आयपीएलमधील दुसरं वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने विजेतेपदावर नाव कोरलं. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. यंदाही गुजरात आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले होते. यामध्ये दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने तीन तर चेन्नईने एका सामन्यात विजय मिळवलाय. 

आज धुमधडाक्यात होणार IPL 2023 ची सांगता

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या सोळाव्या हंगामाचा शेवट 28 मे रोजी अहमदाबादमध्ये होईल. आज, रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम फेरीचा महामुकाबला रंगणार आहे. आयपीएल स्पर्धा क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. या स्पर्धेचा शेवट आज मनोरंजनाने समृद्ध अशा समारोप समारंभानं (IPL Closing Ceremony 2023) होईल. अरिजित सिंह, रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया यांसारख्या स्टार्सनं,आयपीएल 2023 च्या उद्घाटन समारंभाला (IPL Opening Ceremony 2023) हजेरी लावली होती. आज आयपीएलच्या सांगता समारंभही अनेक दिग्गज स्टार्स सामील होणार आहेत.

IPL Closing Ceremony 2023 : संध्याकाळी 6 वाजता रंगणार आयपीएल 2023 चा सांगता सोहळा

CSK vs GT, IPL 2023 Final : आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सामना होणार आहे. आयपीएल 2023 च्या विजेतेपदाचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी समारोप सोहळा आयोजित केला जाणार आहे. या क्लोजिंग सेरेमनीला (IPL Closing Ceremony) अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. आयपीएल 2023 सांगता सोहळा (IPL 2023 Closing Ceremony) संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल.



 

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

GT vs CSK, IPL 2023 Final Match Live Cricket Score: चेन्नई आणि गुजरात आमने-सामने

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सने थेट अंतिम फेरी गाठली. एलिमिनेटर सामन्यात त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असतील.

CSK vs GT IPL 2023 Final LIVE : गुजरात विरुद्ध चेन्नई महामुकाबला

गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघ आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीचा रणसंग्राम आज, 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

पार्श्वभूमी

IPL Final 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. गतविजेता गुजरात आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 ची फायनल रंगणार आहे. यंदाच्या हंगामाची सुरुवातही याच दोन संघामध्ये झाली होती. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. कागदोपत्री दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत.


पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा पराभव


पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या सामन्यात गुजरातला चेन्नई सुपर किंग्स संघाचं आव्हान होतं. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यातील 87 धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे चेन्नई (CSK) संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 172 धावा केल्या. गुजरातने (GT) फलंदाजीत काही बदल केले, पण याचा त्यांना फायदा झाला नाही. शुभमन गिलने 38 चेंडूत 42 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुजरात संघ 20 षटकात केवळ 157 धावा करून सर्व बाद झाला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना 15 धावांनी खेळ जिंकला.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


चेन्नई आणि गुजरात यांच्यात महामुकाबला


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सने थेट अंतिम फेरी गाठली. एलिमिनेटर सामन्यात त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असतील.


चेन्नईची संभावित प्लेईंग 11


ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोइन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान और विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा


गुजरात टायटन्स संभावित प्लेईंग 11 :


वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.