एक्स्प्लोर

CSK vs DC Playing 11 : चेन्नई आणि दिल्ली आमने-सामने, चेपॉक मैदानावर रंगणार सामना; कशी असेल धोनीची प्लेईंग 11

CSK vs DC, IPL 2023 Match 55 : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 55 व्या सामन्यात आज चेन्नई आणि दिल्ली (DC vs CSK) संघ आमने-सामने येणार आहेत.

CSK vs DC, Chepauk Stadium Pitch Report : आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (Chepauk Stadium) आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होणार आहे. 10 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने या मोसमात आतापर्यंत 11 पैकी 6 सामने जिंकले असून संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई संघाकडे 13 गुण आहेत. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स सर्वात शेवटी दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने 10 पैकी चार सामने जिंकले तर, सहा सामने गमावले आहेत.

CSK vs DC, IPL 2023 : चेन्नई विरुद्ध दिल्ली लढत

चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघांनी त्यांच्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईने मागील सामन्यातच मुंबई इंडियन्सचा पराभव केला. तर दुसरीकडे दिल्ली संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. सलग दोन सामन्यांमध्ये विजयानंतर आजचा सामना जिंकून दिल्ली संघ हॅटट्रिक मारण्याच्या प्रयत्नात असेल. तर चेन्नई संघ आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या मैदानावर (Pitch Report) फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

CSK vs DC Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11

CSK Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.

DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रुसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

CSK vs DC Match Preview : चेन्नई विरुद्ध दिल्ली लढत, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget