CSK vs DC LIVE Score, IPL 2020: CSK vs DC LIVE Score, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सची चेन्नई सुपर किंग्सवर 44 धावांनी मात
CSK vs DC LIVE Score, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) मध्ये IPL 2020 सामना खेळला जाणार आहे. ही मॅच दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात येत आहे.
LIVE
Background
IPL 2020, CSK vs DC Live Cricket Score Updates: इंडियन प्रीमियर लीगच्या (आईपीएल) 13व्या सीजनमध्ये आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. चेन्नईने मुंबईला पराभूत करुन विजयाने सुरुवात केली आहे. मात्र, दुसऱ्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नईला हरवलं आहे. मागील दोन्ही सामन्यात चेन्नईची आघाडीची जोडी अपयशी ठरत आहे.
चेन्नईची अडचण मधल्या फळीसाठीही आहे. केदार जाधव, ऋतुराज खुद, धोनी यांना अद्याप लौकीकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. धोनीने मागच्या दोन सामन्यात इंग्लँडचा युवा फलंदाज सॅम कुरेनला त्याच्याआधी खेळायला पाठवलं होतं. धोनीने मागच्या दोन्ही सामन्यात 7 नंबरवर बॅटींग केली होती. धोनीच्या स्लो खेळण्यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. शेवटच्या षटकात त्याने तीन षटकावर लगावले होते. मात्र, त्याला फार उशीर झाला होता.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना खूपच रोमांचकारी होता. मार्कस स्टोयनिसने दिल्लीला बॅट आणि चेंडूने दोन्हींच्या मदतीने वाचवलं होतं. स्टोयनिसने शेवटच्या तीन चेंडूवर किंग्स इलेव्हन पंजाबला एकही धाव दिली नाही. परिणामी मॅच सुपर ओव्हरमध्ये खेळली गेली. जिथं रबाडाने दिल्लीचं काम सोपं केलं.
दिल्ली कॅपिटल्स टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, एलेक्स कॅरी, जेसन रॉय, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत (विकेटकिपर), शिखर धवन, शिमरन हेटमायेर, अक्षर पटेल, क्रिस वोक्स, ललित यादव, मार्कस स्टोइनिस, कीमो पॉल, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, ईशांत शर्मा, कागिसो रबाडा, मोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, संदीप लामिछाने, तुषार देशपांडे.
चेन्नई सुपर किंग्ज टीम : महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), केदार जाधव, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, ड्वायन ब्रावो, कर्ण शर्मा, शेन वाटसन, शार्दूल ठाकुर, अंबाती रायडू, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, दीपक चाहर, लुंगी नगिदी, मिशेल सैंटनर, केएम. आसिफ, नारायण जगदीशन, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, आर. साई किशोर, जोश हेजलवुड, सॅम कुरैन.