(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs DC: डेव्हॉन कॉन्वेचं वादळी अर्धशतक, चेन्नईचं दिल्लीसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2022: या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 55 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं दिल्लीसमोर (Chennai Super Kings vs Delhi Capitals) 209 धावांचं आव्हान ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात विकेट्स गमावून धावा केल्या आहेत. चेन्नईकडून डेव्हॉन कॉन्वेनं (Devon Conway) तुफानी अर्धशतक ठोकलं.
नाणफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी चेन्नईकडून मैदानात आलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वेनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 110 धावांची भागेदारी केली. परंतु, अकराव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर नॉर्टीजेनं ऋतुराज गायकवाडला माघारी धाडलं. त्यानंतर शिवम दुबे मैदानात आला. या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर अंबाती रायडूही स्वस्तात माघारी परतला. चेन्नईचे तीन विकेट्स पडल्यानंतर कर्णधार धोनी मैदानात आला. परंतु, वीसाव्या षटकात नॉर्टीजेनं मोईन अली आणि रॉबिन उथप्पाला सलग दोन चेंडूत आऊट करून माघारी धाडलं. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीची छोटीशी आक्रमक खेळी केली. त्यानं आठ चेंडूत 21 धावांची खेळी केली. ज्यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. दिल्लीकडून नॉर्टिजेनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, खलील अहमदनं दोन आणि मिचेश मार्शनं एक विकेट्स घेतली.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन:
रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, एमएस धोनी (विकेटकिपर, कर्णधार), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेश तिक्षणा, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन:
डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकिपर, कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे.
हे देखील वाचा-