(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : चेन्नईची ताकद वाढली, ज्युनियर मलिंगाची संघात एन्ट्री
Matheesha Pathirana Joins CSK : आयपीएलमध्ये यंदा चेन्नईच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही.
IPL 2022, Chennai Super Kings : आयपीएलमध्ये यंदा चेन्नईच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. रविंद्र जाडेजाच्या नेतृत्वातील चेन्नईला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आज चेन्नईचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर होणार आहे. या सामन्याआधी चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. चेन्नईने दुखापतग्रस्त एडम मिल्नेच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. चेन्नईने श्रीलंकेचा अंडर 19 खेळाडू मथीशा पथिराना याला संधी दिली आहे. मथीशा पथिराना याला गोलंदाजी अॅक्शनवरुन ज्युनिअर मलिंगा म्हणून ओळखलं जातेय. त्याची गोलंदाजीची अॅश्कन मलिंगासारखी आहे. 19 वर्षीय मथीशा पथिराना चेन्नईच्या संघासोबत जोडला गेलाय.
न्यूझीलंडचा वेगवाग गोलंदाज एडम मिल्नेला चेन्नईने 1.90 कोटी रुपयात खरेदी केले होते. मात्र कोलकाता विरोधातील सामन्यात मिल्ने दुखापतग्रस्त झाला. हॅमस्ट्रिंगमुळे मिल्ने आयपीएलमधून बाहेर गेलाय. मिल्नेच्या जागी चेन्नईचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाला संघात स्थान दिलेय. मथीशा पथिरानाला वेगवान गोलंदाज आहे. लसिथ मलिंगाप्रमाणे गोलंदाजी करत असल्यामुळे मशीथाला ज्युनिअर मलिंगा म्हणून ओळखलं जाते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मथीशाने अंडर 19 मध्ये दमदार प्रदर्शन केलेय. चेन्नईने मथीशाला 20 लाख रुपयांमध्ये साइन केले आहे. मथीशाने आतापर्यंत दोन टी 20 सामने आणि लिस्ट ए चा एक सामना खेळला आहे. अंडर 19 विश्वचषकात मथीशाने पाकिस्तान, वेस्ट विंडिजविरोधात प्रत्येकी दोन दोन बळी घेतले होते.
Welcome Matheesha Pathirana, the Young pace 💪into the SuperFam🦁#Yellove #WhistlePodu 💛 pic.twitter.com/C7FURylQeS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 21, 2022
दीपक चाहरच्या अनुपस्थितीत चेन्नईची गोलंदाजी कमकुवत दिसत होती. ब्राव्होचा अपवाद वगळता एकाही वेगवान गोलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. विकेट तर सोडा धावाही रोखता आल्या नव्हत्या. परिणामी चेन्नईला सहा सामन्यात पाच पराभव स्विकारावे लागले होते. आता मथीशा पथिरानाच्या अगमानामुळे चेन्नईच्या गोलंदाजीची धार मजबूत होईल.
मुंबई-चेन्नईची खराब कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई आणि चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी आहे. तर, चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचं आव्हान संपुष्टात येणार आहे.