CSK Anthem Song : धोनीची रिक्षातून एन्ट्री, अंगावर शहारे आणणारं चेन्नईचं Theme Song पाहिलत का?
CSK Anthem Song : आयपीएलच्या पंधराव्या सीजनला नुकतीच सुरुवात झाली असून सर्व संघानी कसून सराव करत सोशल मीडियावरही दमदार ब्रँडिग केलं आहे.
IPL 2022, CSK Anthem Song : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने सामने प्रेक्षकांच्या उपस्थित मुंबईत होत आहेत. यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. त्यात यंदा महालिलाव झाल्यामुळे सर्व संघात बरेच बदल देखील झाले आहेत. त्यामुळे सामने आणखी चुरशीचे होऊ शकतात. दरम्यान या चुरशीच्या आयपीएलपूर्वी स्पर्धेतील एक आघाडीचा संघ चेन्नई सुपरकिंग्सने त्यांचं अॅन्थम पोस्ट केलं आहे. यामध्ये सुरुवातीला धोनी एका रिक्षातून एन्ट्री करतो, ज्यानंतर दमदार असं गाणं वाजून त्यावर चेन्नईकर तुफान डान्स करतात.
सीएसके आणि आयपीएल
आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळण्यात आला होता. या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2010 मध्ये चेन्नईनं मुंबई इंडियन्सला धूळ चारुन पहिली ट्रॉफी जिंकली होती. 2011 मध्ये चेन्नईच्या संघानं त्यांची दुसरी ट्रॉफी जिंकली. 2016 आणि 2017 मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नईच्या संघावर दोन वर्षाची बंदी घालण्यात होती. त्यानंतर 2018 मध्ये सनरायझर्सला अंतिम सामन्यात पराभूत करून चेन्नईनं तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. परंतु, 2020 मध्ये चेन्नईला काही खास कामगिरी करता आली नाही. या हंगामात चेन्नईचा संघ प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकला नाही. मात्र, 2021 मध्ये महिंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उचलली. आता पाचव्यांदा ट्रॉफी उचण्याची संधी चेन्नईकडे असून यंदा कर्णधारपद धोनीने जाडेजाकडे सोपवलं आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी
- IPL 2022 : आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने
- CSK vs KKR Toss Update : केकेआरने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वाचा अंतिम 11 कोण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha