CSK vs DC IPL 2023: पथीराणा-चाहरचा भेदक मारा, चेन्नईचा दिल्लीवर 27 धावांनी विजय
CSK vs DC IPL 2023: पथीराणा आणि दीपक चाहर यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव केलाय.
CSK vs DC IPL 2023: पथीराणा आणि दीपक चाहर यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव केलाय. पथीराणा आणि दीपक चाहर यांनी दिल्लीचा अर्धा संघ तंबूत धाडला. चेन्नईने दिलेल्या 168 दावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 140 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईचा 12 सामन्यातील हा सातवा विजय होय.. या विजयासह चेन्नईचे 15 गुण झाले आहेत. तर दिल्लीचा 11 सामन्यातील हा सातवा पराभव होय. दिल्ली 8 गुणांसह तळालाच आहे. त्याशिवाय दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय.
चेन्नईने दिलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार डेविड वॉर्नर याला खातेही उघडता आले नाही. दीपक चाहर याने वॉर्नला तंबूत पाठवले. कर्णधार माघारी परतल्यानंतर फिल साल्टही लगेच तंबूत परतला. साल्ट याने 17 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. साल्ट बात झाल्यानंतर मिचेल मार्शही तंबूत परतला.. मिचेल मार्श याला रहाणेने धावबाद केले. मार्श याने पाच धावांचे योगदान दिले. 25 धावांत दिल्लीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.
दिल्लीचा कोसळलेला डाव रीले रुसो आणि मनिष पांडे यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. त्यानंतर फटकेबाजी केली. पण पथीराणा याने मनिष पांडेला बाद करत इम्पॅक्ट पाडला. मनिष पांडे याने 29 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. मनिष पांडे बाद झाल्यानंतर रीले रुसोही लगेच बाद झाला. रुस याने 35 धावांचे योगदान दिले.. त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले.. पण यासाठी त्याने 37 चेंडूचा सामना केला. मनिष पांडे आणि रुसो यांनी चौथ्या विकेटसाठी 59 चेंडूत 59 धावांची भागिदारी केली.
दिल्लीचा अर्धा संघ तंबूत परल्यानंतर अक्षर पटेल यान लढा देण्याचा प्रयत्न केला.. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. वाढती धावगती पाहून अक्षर पटेल याने चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न केला.. पण पथीराणा याने अक्षर पटेल याला तंबूत धाडले. अक्षर पटेल याने 12 चेंडूत एक षटकार आणि एका चौकारासह 21 धावांचे योगदान दिले. ललीत यादव यालाही फारकाळ मैदानावर तग धरता आला नाही. ललीत यादव याने पाच चेंडूत तीन चौकारासह 12 धावांचे योगदान दिले.
चेन्नईकडून पथीराणा आणि दीपक चहर यांनी भेदक मारा केला. या दोघांनी दिल्लीचा अर्धा संघ तंबूत धाडले. पथीराणा याने तीन विकेट घेतल्या तर चाहर याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. रविंद्र जाडेजा याने एक विकेट घेतली. दिल्लीचे दोन फलंदाज धावबाद झाले.. रिपल पटेल आणि मिचेल मार्श धावबाद झाले.