पहाटेच्या विमानाचं तिकीट, सर्व तयारी झाली, मात्र रात्री 11 वा. फोन आला, तू टीममध्ये नाही, CSK चा गोलंदाज हळहळला!
IPL 2022 Marathi News : आयपीएलचा 15 वा हंगाम चेन्नईसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा गेलाय... साखळी फेरीतच चेन्नईचे आव्हान संपुष्टात आलेय..
Simarjeet Singh Journey : आयपीएलचा 15 वा हंगाम चेन्नईसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा गेलाय... साखळी फेरीतच चेन्नईचे आव्हान संपुष्टात आलेय.. चेन्नईसाठी मैदानासह मैदानाबाहेरही वाइट काळ होता... रवींद्र जाडेजाना आठ सामन्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला. राहुल चाहर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला.. यातून संघ सावरलाच नाही.. धोनीने पुन्हा कर्णधारपदाची सुत्रे स्विकारत चेन्नईला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. .पण त्यात अपयश आले. पण चेन्नईसाठी मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंह.. दोन चांगले गोलंदाज मिळाले आहेत. दोन्ही गोलंदाज स्विंगमध्ये मास्टर आहे. भविष्यात चेन्नईसाठी हे दोन्ही गोलंदाज मॅचविनर ठरु शकतात. राहुल चाहरच्या अनुपस्थिती दोघांनी वेगवान माऱ्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंहने त्याच्यासोबत घडलेला किस्सा सांगितलाय...
सिमरजीत सिंह अंडर 19 संघाचा भाग राहिलाय. स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतोय. चेन्नईच्या एका व्हिडीओ सिमरजीतने स्वत सोबत घडलेला एक प्रसंग सांगितला.. सकाळी विमानाने सामना खेळण्यासाठी जायचे होते, त्याआधी काही तास त्याला संघात नसल्याचे सांगितल्याचा किस्सा सिमरजीतने सांगितला.
तो म्हणाला की, माझी भारतीय संघात निवड झाली होती. मला अंडर 19 आशिया चषकासाठी भारतीय संघात निवडले होते. मला ज्यादिवशी फ्लाइटने रवाना व्हायचे होते.. त्याआधी काही तास मला फोन आला... तुम्ही याआधीही आशिया चषकात खेळलात.. त्यामुळे तुम्हाला आता खेळता येणार नाही..सकाळी सात वाजता माझी फ्लाइट होती.. पण रात्री मला 11 वाजता फोन आला आणि तू संघाचा भाग नसल्याचे सांगितले... या प्रकारानंतर मला खूप वाईट वाटले.. पण त्यावेळी माझ्या आई वडिलांनी मला हिंमत दिली. त्यामुळेच मी स्वत:ला सावरु शकलो. आई वडिल मला म्हणाले की, तू आता जिथे आहे, गर्व करायला हवा.. त्यानंतर माझा आत्मविश्वास परतला... पुढील दौऱ्यासाठी माझी निवड झाली.
सिमरजीत सिंहने चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) सनराइजर्स हैदराबाद (SRH) विरोधात आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने चार षटकात 27 धावांच्या मोबद्लयात दोन विकेट घेतल्या. चेन्नईने सिमरजीतला 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलेय. याआधी 2021 मध्ये सिमरजीत मुंबई इंडियन्स संघाचा सहभाग होता.. मुंबईकडून त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.