एक्स्प्लोर

KKR vs CSK IPL 2025 : हुश्श...! अखेर चेन्नईनं चाखली विजयाची चव, माहीची जादू अन् अंजिक्य रहाणेचे गणित बिघडले

KKR vs CSK IPL 2025 Points Table Latest : सलग 4 सामने गमावल्यानंतर चेन्नईला अखेर विजय मिळाला.

Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings IPL 2025 : आयपीएल 2025 मधून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जने अखेर विजयाची चव चाखली. या स्पर्धेत धोनीच्या संघाने फक्त तिसरा विजय नोंदवला आहे. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या एका रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा शेवटच्या षटकात 2 विकेट्सने पराभव झाला. यासह, चेन्नईने गतविजेत्या कोलकाता संघाचे प्लेऑफचे गणित बिघडले. अशाप्रकारे, सलग 4 सामने गमावल्यानंतर चेन्नईला अखेर विजय मिळाला. या विजयाचे हिरो होते फिरकी गोलंदाज नूर अहमद आणि युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस. 

अजिंक्य रहाणेची आयपीएलमध्ये एक मोठी कामगिरी 

जेव्हा केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. संघाला पहिला धक्का 11 धावांवर पडला. रहमानउल्लाह गुबराज फक्त 11 धावा करून आऊट झाला. पण, त्यानंतर अजिंक्य रहाणेने सुनील नारायणला चांगली साथ दिली आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. ही जोडी नूर अहमदने फोडली. दोन धावांच्या आत, रहाणेही 48 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीमुळे रहाणेने आयपीएलमध्ये एक मोठी कामगिरी केली. या मेगा लीगमध्ये 5000 धावा करणारा तो जगातील नववा खेळाडू ठरला.

या दोघांच्या बाद झाल्यानंतर केकेआर संघ अडचणीत सापडल्याचे दिसत होते, परंतु मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांनी काही शानदार फटके खेळले आणि चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. रसेलने 21 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावांची खेळी खेळली. दरम्यान, पांडे 28 धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे, केकेआरने संपूर्ण षटक खेळले आणि 179/6 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

180 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली, कारण दोन्ही सलामीवीर त्यांचे खाते न उघडताच आऊट झाले. आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉनवेही शून्य धावांवर आऊट झाले. पण या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या उर्विल पटेलने आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याने 31 धावांच्या स्फोटक खेळीत 1 चौकार आणि 4 षटकार मारले. सीएसके संघ व्यवस्थापनाने एक सट्टा खेळला आणि रविचंद्रन अश्विनला चौथ्या क्रमांकावर पाठवले, परंतु अश्विन फक्त 8 धावा काढून आऊट झाला. रवींद्र जडेजाला सुरुवात चांगली मिळाली, पण 10 चेंडूत 19 धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेचा अर्धा संघ 60 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांचा तांडव

पण शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी 67 धावांची भागीदारी करून या अडचणीतून संघाला सावरले. ब्रेव्हिसने फक्त 25 चेंडूत 52 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 4 षटकार आणि 4 चौकार मारले. दुसरीकडे, शिवम दुबेने 40 चेंडूत 45 धावा केल्या. शिवम दुबे सोबत 43 धावांची भागीदारी करून एमएस धोनीने आपल्या संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला होता. 19 व्या षटकात 45 धावा काढून शिवम दुबे बाद झाला. पण शेवटी धोनीने संघाचा विजय निश्चित केला.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget