Brendon McCullum या एकमेव केकेआरच्या खेळाडूने ठोकलं आहे IPL शतक, तुम्हाला आठवतेय का 'ती' अविस्मरणीय खेळी?
जगातील सर्वात भव्य अशी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर क्रिकेट लीग अर्थात आयपीएल (IPL) स्पर्धेला 15 वर्षे झाली असून 2008 मध्ये या स्पर्धेचा पहिला सामना आजच्याच दिवशी खेळवण्यात आला होता.

Brendon McCullum Century : तारीख 18 एप्रिल, 2008, ठिकाण बंगळुरुचं प्रसिद्ध असं एम. चिन्नस्वामी स्टेडियम आणि सुरुवात झाली इंडियन प्रिमीयर लीगला. जगातील सध्याच्या घडीची सर्वात मोठी क्रिकेच लीग असणाऱ्या या स्पर्धेला सुरुवात होऊ आज इतकी वर्षे झाली असली तरी पहिल्या दिवशीच आणि पहिल्या सामन्यातच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ब्रेंडन मॅक्क्युलमने (Brendon McCullum) ठोकलेलं शतक खास आहे. 73 चेंडूत ब्रँडनने कुटलेल्या 158 धावांच्या खेळीने सर्व क्रिकट जगताला आवाक करुन सोडलं होतं. विशेष म्हणजे पुढील बरीच वर्षे हा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर होताच शिवाय त्यानंतर आजवर केकेआरच्या संघातील एकाही खेळाडूला शतक ठोकता आलेलं नाही.
जगातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं आयपीएल या स्पर्धेत खेळण्याचं. आज या क्रिकेट स्पर्धेला 15 वर्षे झाली असून 2008 मध्ये या स्पर्धेचा पहिला सामना आजच्याच दिवशी खेळवण्यात आला होता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या दोन संघातील या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या गोलंदाजाना केकेआरच्या एकट्या ब्रँडनने सळो की पळो केलं. त्याने 13 षटकार आणि 10 चौकार ठोकत 73 चेंडूत 158 धावा केल्या. ज्यामुळे बंगळुरुला विजयासाठी 222 धावांची गरज होती. इतकं भव्य आव्हान पाहून बंगळुरुचा संघ 82 धावांतच गारद झाला आणि केकेआरने सामना 140 धावांनी जिंकला. सामन्याचा सामनावीर अर्थात ब्रँडन ठरला. तर आज आयपीएलच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त या खेळीला आठवत डेव्हिड हस्सी याने ब्रँडनची एक मुलाखत घेतली असून ती आयपीएलतर्फे त्यांच्या ट्वीटरवर पोस्ट देखील करण्यात आली आहे.
2008 मध्ये सुरु झाली होती आयपीएल
आयपीएलचा यंदा 15 वा सीजन सुरु असून पहिला सीजन 2008 मध्ये खेळवण्यात आला होता. आयपीएल 2008 चं आयोजन 18 एप्रिल ते 1 जून यादरम्यान करण्याक आलं होतं. यावेळी एकूण आठ संघ सामिल होते. यावेळी 59 लीग सामने खेळवण्यात आले होते. या आयपीएलचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. रहा सामना राजस्थानने शेन वॉर्नच्या कर्णधारीखाली तीन विकेट्सनी जिंकला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय हे मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर असून त्यांनी पाच वेळा कप उचलला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ आणि गुजरात हे दोन नवे संघ सामिल झाल्यामुळे 10 संघात आयपीएल चषक मिळवण्याची चुरस आहे.
हे देखील वाचा-
- IPL 15 : IPL झाली 15 वर्षांची, आजच्याच दिवशी झाला होता पहिला सामना, आयपीएलमधील आठवणींचा 'हा' खास VIDEO पाहाच
- Cancel IPL Trending: 'आयपीएल रद्द करा!', दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी
- Covid-19 Hits IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्यालं जाणं रद्द
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
