Arjun Tendulkar : अर्जूनला अखेरपर्यंत अंतिम 11 मध्ये संधी मिळालीच नाही, भावाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सारा तेंडुलकरने शेअर केला VIDEO
यंदाच्या हंगामात अत्यंत खराब कामगिरीमुळे मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्यांचे सर्व सामने झाले असून युवा खेळाडू अर्जून तेंडुलकरला यंदाही संधी मिळालेली नाही.
![Arjun Tendulkar : अर्जूनला अखेरपर्यंत अंतिम 11 मध्ये संधी मिळालीच नाही, भावाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सारा तेंडुलकरने शेअर केला VIDEO Arjun tendulkar Did not get chance in final Playing 11 for Mumbai Indians his sister sara shares motivational video for arjun Arjun Tendulkar : अर्जूनला अखेरपर्यंत अंतिम 11 मध्ये संधी मिळालीच नाही, भावाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सारा तेंडुलकरने शेअर केला VIDEO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/1d2f30f9ee762c69897a38d0287dd3cf_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Arjun Tendulkar in Mumbai Indians : आयपीएल 2022 स्पर्धेतून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात (IPL 2022) सुरुवातीपासून सामने गमावत राहिल्याने त्यांच आव्हान सर्वात आधी संपुष्टात आलं. दरम्यान संघाकडून मोजक्याच सोडल्यास इतर खेळाडूंनी अत्यंत सुमार कामगिरी केली. या सर्वात संघातील युवा खेळाडू आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला अखेरपर्यंत एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. अनेकदा त्याला संधी मिळेल असे वाटत होते, सोशल मीडियावरही मुंबईच्या चाहत्यांनी अर्जूनला खेळवण्याची जोरदार मागणी केली, पण अर्जूनला अखेरपर्यंत संधी मिळाली नाही.
मुंबईचा अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पार पडला. याच अखेरच्या सामन्यावेळी मैदानात राखीव खेळाडू म्हणून उपस्थित असलेल्या अर्जूनचा एक व्हिडीओ त्याची बहिण साराने स्टोरीला शेअर करत 'अपना टाईम आयेगा' हे गाणं त्या व्हिडीओला बॅकग्राऊंडमध्ये लावलं होतं. तुला नक्कीच लवकर संधी मिळेल आणि तू कमाल करशील अशा प्रकारचा संदेश सारा या व्हिडीओतून देऊ इच्छित होती.
मागीस वर्षीही अर्जूनला मिळाली नव्हती संधी
आयपीएल 2021 मध्ये सर्वात आधी मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसला अर्जूलना संघात घेतलं होतं. पण संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यानंतर यंदा आयपीएल 2022 च्या महालिलावात त्याच्या 20 लाख बेस प्राईसवर गुजरात टायटन्सने 25 लाखांची बोली लावली. ज्यानंतर मुंबईने 30 लाखांची बोली लावत त्याला विकत घेतलं. त्यामुळे यंदातरी त्याला संधी मिळणार का हे तरी पाहावं लागेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)