Sunil Gavaskar : 'आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहतोय', आयपीएल कॉमेन्ट्री दरम्यान गावस्करांचा टोला
IPL 2022 : मैदानावर तुफान फटकेबाजी केलेले गावस्कर आता निवृत्तीनंतर त्यांच्या हटके कॉमेन्ट्रीमुळे देखील चर्चेत असतात.
Sunil Gavaskar commentary : आयपीएल (IPL 2022) सामने म्हटलं की, मैदानात खेळाडूंच्या तुफान खेळासह, प्रेक्षकांच्या हटके करामती आणि कॉमेन्टेटर्सच्या टोलवाटोलवीनं सर्वांचच मनोरंजन होत असतं. त्यात सुनील गावस्करांसारखे कॉमेन्टेटर असल्याच त्यांची कॉमेन्ट्री ऐकताना वेगळीच मजा येते. रविवारी देखील लखनौ विरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांच्या एका वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले. गावस्कर यांनी सामन्यादरम्यान सोबत असलेल्या ब्रिटीश कॉमेन्टेटर एलन विल्किन्स याला आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहत आहोत, असा टोला लगावला.
नेमकं घडलं काय?
लखनौ विरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान कॅमेरामन्सनी वानखेडे मैदानाजवळ असलेले मरीन लाईन्सचे व्हिज्युवल्स दाखवले. यावेळी क्वीन्स नेकलेस अशा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या किनाऱ्याला पाहताना सुनील गावस्कर यांना इंग्लंडकडे असलेल्या कोहिनूर हिऱ्याची आठवण आली, ज्यामुळे त्यांनी थेट सोबत असलेल्या ब्रिटीश कॉमेन्टेटर एलन विल्किन्स यांना मिश्किलपणे आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहत आहोत, असा टोला लगावला. ज्यानंतर एलन यांनी देखील तुम्ही याबद्दल थेट ब्रिटीश सरकारला विचारणा करु शकता असं प्रतित्यूतर केलं. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडीओ देखील ट्वीटरवर व्हायरल होत आहे.
राजस्थानचा रोमहर्षक विजय
ज्या सामन्यात सुनील यांनी हा टोला लगावला तो सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेला आयपीएल 2022 मधील वीसावा सामना होता. राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Hardik Pandya : या पठ्यानं थेट हार्दिक पंड्यालाच केलं चँलेज; आता नोकरी गमवावी लागणार का? जाणून घ्या नेमकं प्रकरण
- IPL 2022 : 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन; SRH ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच
- CSK vs RCB : आज चेन्नईविरुद्धच्या सामन्याला आरसीबीचा दिग्गज खेळाडू मुकणार; कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11