SRH vs RCB : आरसीबी हैदराबादविरोधात उतरणार हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये, जाणून घ्या कारण...
SRH vs RCB, IPL 2022 Marathi News : फाफ डु प्लेलिसच्या नेतृत्तवातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ रविवारी हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे.
SRH vs RCB, IPL 2022: फाफ डु प्लेलिसच्या नेतृत्तवातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ रविवारी हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या मैदानात दरवर्षी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बंगलोरच्या संघातील खेळाडू एका सामन्यात हिरवी जर्सी परिधान करतात. यंदा आरसीबीचा संघ हैदराबादविरुद्धच्या सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.
आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात रविवारी दुपारी साडेतीन वाजता सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर दोन्ही संघ आमने-सामने असतील. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. त्यामुळे विजयाच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. यंदा आरसीबीची धुरा फाफ डु प्लेसिसकडे आहे तर हैदराबादचे नेतृत्व केन विल्यमसन करत आहे.
आरसीबीने ट्वीट करत हिरव्या रंगाची जर्सी घालणार असल्याची माहिती दिली आहे. Go Green Game या अंतर्गत जर्सी घालून आरसीबी रविवारी मैदानात उतरणार आहे. 2021 मध्ये आरसीबीच्या या परंपरेला खंड पडला होता. कारण, कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आरसीबीचा संघ निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरला होता.
आरसीबीचे ट्वीट -
It’s time for our Go Green Game, 12th Man Army, and we couldn’t be more excited! 🤩🙌🏻
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 7, 2022
Are you ready to #GoGreen and cheer for #RCB as we take on #SRH this Sunday at 3:30 PM IST? 💚🥳#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #Reels #ForPlanetEarth pic.twitter.com/ukcCAVHwxl
काय आहे कारण?
आरसीबीने गो ग्रीनचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. आरसीबीचे मालक सिद्धार्थ मल्ल्या यांच्या कल्पनेतून गो ग्रीन मोहिमेंतर्गत ही सुरुवात करण्याता आली होती. प्रत्येकवर्षी एका सामन्यासाठी आरसीबी ही जर्सी घालून मैदानात उतरत असते. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आरसीबीचा कोच्ची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता. आरसीबीचा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक झाडही भेट म्हणून देतो.
हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये आरसीबीची कामगिरी -
आयपीएल 2011- विजय
आयपीएल 2012- पराभव
आयपीएल 2013- पराभव
आयपीएल 2014- पराभव
आयपीएल 2015 -निकाल नाही
आयपीएल 2016- विजय
आयपीएल 2017- पराभव
आयपीएल 2018- पराभव
आयपीएल 2019- पराभव
आयपीएल 2020- पराभव
आयपीएल 2021- निळ्या रंगाची जर्सी (पराभव)