GT vs MI Eliminator Playing 11 : हायहोल्टेज सामन्यात दोन्ही संघात मोठे बदल, मुंबईचे दोन तर गुजरातचा 1 नवा पठ्ठ्या मैदानात; जाणून घ्या प्लेइंग-11
Gujarat Titans vs Mumbai Indians Eliminator IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्सला गेल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला.

Gujarat Titans vs Mumbai Indians Eliminator IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्सला गेल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. परिणामी, त्यांना आता एलिमिनेटरमध्ये खेळावे लागणार आहे, जिथे त्यांचा सामना 30 मे रोजी 5 वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सशी होत आहे. हा सामना पंजाबच्या होमग्राउंड मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
🚨 Toss 🚨@mipaltan won the toss and elected to bat first against @gujarat_titans
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Updates ▶️ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/E3G3NU0FXK
या हंगामात या मैदानावर दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. दोन्ही संघ पराभवानंतर येथे आले आहेत. गुजरातला चेन्नईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. विजयी संघाला क्वालिफायर-2 खेळण्याची संधी मिळेल तर पराभूत संघाचा प्रवास या हंगामात संपेल.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन यांनी पदार्पण केले आहे. याशिवाय राज बावाला संधी मिळाली आहे. त्याच वेळी, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. जोस बटलरच्या जागी कुसल मेंडिसचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अर्शदच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
Big day. Big game. 👊
— Mumbai Indians (@mipaltan) May 30, 2025
Our XI is ready for the all-important clash 📝💥#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/6tHoX5ra7o
गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग इलेव्हन -
शुभमन गिल, साई सुदर्शन, कुसल मेंडिस, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
Our 𝐗𝐈 for the #Eliminator 👊 pic.twitter.com/yRNRywWFXR
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 30, 2025
हे ही वाचा -





















