एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथची यंदाच्या आयपीएलमधूनही हकालपट्टी?
बॉल टॅम्परिंगनंतर ऑस्ट्रेलियाचे कर्णधार-उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासह फलंदाज कॅमेरुन बॅनक्रॉफ्टलाही घरचा रस्ता दाखवण्यात आला. आता यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे वॉर्नर आणि स्मिथच्या आयपीएलमधील सहभागाचा.
मुंबई : बॉल टॅम्परिंगनंतर ऑस्ट्रेलियाचे कर्णधार-उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासह फलंदाज कॅमेरुन बॅनक्रॉफ्टलाही घरचा रस्ता दाखवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यानच त्यांना घरी परतावं लागणार आहे. मात्र आता यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे वॉर्नर आणि स्मिथच्या आयपीएलमधील सहभागाचा.
राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली. तर डेव्हिड वॉर्नर सनरायझर्सच्या कर्णधारपदी कायम आहे. या दोन्ही खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू द्यायचं की नाही, याचा अंतिम निर्णय बीसीसीआय घेणार आहे.
वॉर्नर आणि स्मिथची आयपीएलमधील भूमिका त्यांच्या बंदीच्या निर्णयावर अवलंबून असेल. त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी बीसीसीआयची आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी म्हटलं आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणातील दोषींना पुढच्या 24 तासात शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यानंतर या दोघांच्या आयपीएलमधील सहभागाबाबत निर्णय होऊ शकतो.
बॉल टॅम्परिंगप्रकरणी स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट दोषी
केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी पूर्ण झाली. यामध्ये संपूर्ण संघ नाही, तर तीनच खेळाडू यामध्ये दोषी आढळले. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफी मागितली.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिघे बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले. तर डॅरेन लिमन यांना या षडयंत्राची कल्पना नसल्याचं आढळल्यामुळे ते प्रशिक्षकपदी कायम राहणार आहेत.
स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट ऐवजी मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स यांची जोहान्सबर्गमधील चौथ्या कसोटीसाठी संघात वर्णी लागली आहे. टिम पेनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांना तातडीने ऑस्ट्रेलियाला बोलावण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (तिसऱ्या) केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर स्मिथनं याची कबुलीही देताना हा रणनीतीचाच एक भाग होता, असं मान्य केलं होतं.
बॅनक्रॉफ्टचं चेंडू अवैधरित्या हाताळणं कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या चांगलंच अंगाशी आलं. स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर कर्णधार स्मिथ आपल्या पदावरुन पायउतार झाला, तर डेव्हिड वॉर्नरनेही उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला.
आयसीसीनं स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आहे आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली आहे. तर बॅनक्रॉफ्टला 75 टक्के दंड ठोठावला असून तीन डिमेरीट्स पॉईंट देण्यात आले आहेत.
बॉल टॅम्परिंग म्हणजे काय?
बॉल टॅम्परिंग या क्रिकेटिंग टर्मचा मराठीत चेंडू अवैधरित्या हाताळणं असा सोपा अनुवाद आपल्याला करता येईल. पण चेंडू अवैधरित्या हाताळणं यात अनेक गैरप्रकारांचा समावेश होतो.
माती, बाटलीच्या झाकणाने किंवा कोणत्याही वस्तूनं चेंडू जाणीवपूर्वक घासणं, चेंडूची शिवण दातांनी किंवा नखांनी उसवणं, चेंडूवर दातांनी किंवा नखांनी ओरखडे पाडणं, मिंट किंवा च्युईंग गम चघळून तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेनं किंवा व्हॅसेलिनसारखे पदार्थ लावून चेंडूच्या एका बाजूची लकाकी राखणं या साऱ्या बाबी बॉल टॅम्परिंगमध्ये मोडतात.
संबंधित बातम्या :
व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल
स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!
'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं
क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना
स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement