IPL Mega Auction 2022 : तगड्या खेळाडूंची कोटींची उड्डाणे मात्र रैनासह 'हे' दिग्गज अजूनही अनसोल्ड, आजच्या लिलावाकडे लक्ष
IPL Mega Auction 2022 today : पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू खेळाडू ठरला. मात्र या हंगामासाठी पहिल्या दिवशी काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.
IPL Mega Auction 2022 today LIVE : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सुरु आहे. काल पहिल्या दिवशी दहा संघांनी 74 खेळाडूंवर 388 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली. 74 खेळाडूंमध्ये 54 भारतीय आणि 20 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दिल्ली संघाने सर्वाधिक खेळाडूंना खरेदी केलं. पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू खेळाडू ठरला. मात्र या हंगामासाठी पहिल्या दिवशी काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.
मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेला सुरेश रैना, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ, बांग्लादेशचा स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन आणि दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज खेळाडू डेविड मिलर यांना कुणीही खरेदीदार काल मिळाला नाही. आज या दिग्गज खेळाडूंसह अन्य काही खेळाडूंच्या लिलावाकडेही लक्ष लागून आहे.
आवेश खान सर्वात महागडा अनकॅप खेळाडू
मुंबई इंडियन्सने ईशानला 15.25 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. तर आवेश खान सर्वात महागडा अनकॅप खेळाडू राहिला. लखनौ संघाने आवेश खानला 10 कोटी रुपयांत खरेदी केलं. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला आहे.
पहिल्या दिवसाच्या लिलावानंतर आतापर्यंत दहा संघ असे...
चेन्नई सुपर किंग्स
१० शिलेदार – रवींद्र जाडेजा (१६ कोटी), महेंद्रसिंग धोनी (१२ कोटी), मोईन अली (८ कोटी), ऋतुराज गायकवाड (६ कोटी), रॉबिन उथाप्पा (२ कोटी), ड्वेन ब्राव्हो (४.४० कोटी), अंबाती रायुडू (६.७५ कोटी), दीपक चहर (१४ कोटी), केएम आसिफ (२० लाख), तुषार देशपांडे (२० लाख).
बटव्यातली शिल्लक रक्कम – २०.४५ कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स
१३ शिलेदार – रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी), एनरिच नॉकिया (६.५ कोटी), डेव्हिड वॉर्नर (६.२५ कोटी), मिचेल मार्श (६.५ कोटी), शार्दूल ठाकूर (१०.७५ कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (२ कोटी), कुलदीप यादव (२ कोटी), अश्विन हेब्बर (२० लाख), सरफराझ खान (२० लाख), कमलेश नागरकोटी (१.१० कोटी), केएस भरत (२ कोटी).
बटव्यातली शिल्लक रक्कम – १६.५० कोटी रुपये
कोलकाता नाईट रायडर्स
९ शिलेदार – आंद्रे रसेल (१२ कोटी), वरुण चक्रवर्ती (८ कोटी), वेंकटेश अय्यर (८ कोटी), सुनील नारायण (६ कोटी), पॅट कमिन्स (७.२५ कोटी), श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी), नितीश राणा (८ कोटी), शिवम मावी (७.२५ कोटी), शेल्डन जॅकसन (६० लाख).
बटव्यातली शिल्लक रक्कम – १२.६५ कोटी रुपये
लखनौ सुपर जायंटस
११ शिलेदार – लोकेश राहुल (१७ कोटी), मार्कस स्टॉईनिस (९.२ कोटी), रवी बिष्णोई (चार कोटी), क्विन्टॉन डी कॉक (६.७५ कोटी), मनिष पांडे (४.६० कोटी), जेसन होल्डर (८.७५ कोटी), दीपक हूडा (५.७५ कोटी), कृणाल पंड्या (८.२५ कोटी), मार्क वूड (७.५० कोटी), आवेश खान (१० कोटी), अंकित सिंग (५० लाख).
बटव्यातली शिल्लक रक्कम – ६.९० कोटी रुपये
मुंबई इंडियन्स
८ शिलेदार – रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमरा (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (आठ कोटी), कायरन पोलार्ड (सहा कोटी), ईशान किशन (१५.२५ कोटी), डेवाल्ड ब्रेविस (३ कोटी), बसिल थम्पी (३० लाख), मुरुगन आश्विन (१.६ कोटी).
बटव्यातली शिल्लक रक्कम – २७.८५ कोटी रुपये
पंजाब किंग्स
११ शिलेदार – मयांक अगरवाल (१२ कोटी), अर्शदीपसिंग (४ कोटी), शिखर धवन (८.२५ कोटी), कागिसो रबाडा (९.२५ कोटी), जॉनी बेअरस्टो (६.७५ कोटी), राहुल चहर (५.२५ कोटी), शाहरुख खान (९ कोटी), हरप्रीत ब्रार (३.८० कोटी), प्रभसिमरनसिंग (६० लाख), जितेश शर्मा (२० लाख), ईशान पोरेल (२५ लाख)
बटव्यातली शिल्लक रक्कम – २८.६५ कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स
११ शिलेदार – संजू सॅमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी) यशस्वी जैस्वाल (४ कोटी), रवीचंद्रन आश्विन (५ कोटी), ट्रेण्ट बोल्ट (८ कोटी), शिमरॉन हेटमायर (८.५० कोटी), देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी), प्रसिध कृष्णा (१० कोटी), युजवेंद्र चहल (६.५० कोटी), पराग रियान (३.८ कोटी), केसी करिअप्पा (३० लाख)
बटव्यातली शिल्लक रक्कम – १२.१५ कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
११ शिलेदार – विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), मोहम्मद सिराज (सात कोटी), फाफ ड्यू प्लेसी (७ कोटी), हर्षल पटेल (१०.७५ कोटी), वानिंदू हसारंगा (१०.७५ कोटी), दिनेश कार्तिक (५.५० कोटी), जोश हेझलवूड (७.७५ कोटी), शाहबाज अहमद (२.४ कोटी), अनुज रावत (३.४ कोटी), आकाशदीप (२० लाख)
बटव्यातली शिल्लक रक्कम – ९.२५ कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद
१२ शिलेदार – केन विल्यमसन (१४ कोटी), अब्दुल समद (चार कोटी), उमरान मलिक (चार कोटी), वॉशिंग्टन सुंदर (८.७५ कोटी), निकोलस पूरन (१०.७५ कोटी), भुवनेश्वर कुमार (४.२० कोटी), टी. नटराजन (४ कोटी), राहुल त्रिपाठी (८.५ कोटी), प्रियम गर्ग (२० लाख), अभिषेक शर्मा (६.५ कोटी), कार्तिक त्यागी (४ कोटी), श्रेयस गोपाल (७५ लाख), जगदीश सुचित (२० लाख).
बटव्यातली शिल्लक रक्कम – २०.१५ कोटी रुपये
गुजरात टायटन्स
१० शिलेदार – हार्दिक पंड्या (१५ कोटी), राशिद खान (१५ कोटी) शुभमन गिल (८ कोटी), मोहम्मद शमी (६.२५ कोटी), जेसन रॉय (२ कोटी), लॉकी फर्ग्युसन (१० कोटी), अभिनव सदरंगानी (२.६ कोटी), राहुल तेवातिया (९ कोटी), नूर अहमद (३० लाख), साई किशोर (३ कोटी). बटव्यातली शिल्लक रक्कम – १८.८५ कोटी रुपये