Lalit Modi : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर, कोरोनाची बाधा झाल्यामुळे बिघडली प्रकृती
Lalit Modi hospitalised : ललित मोदी यांना कोरोनाची बाधा झाली असून आता त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिला गेला आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी काही फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
![Lalit Modi : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर, कोरोनाची बाधा झाल्यामुळे बिघडली प्रकृती IPL Ex chief Lalit Modi hospitalised after getting corona positive placed on oxygen for life support know details Lalit Modi : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर, कोरोनाची बाधा झाल्यामुळे बिघडली प्रकृती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/ef4b4b2e70c6ba2f06f97cc6fa6833501673692994733323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lalit Modi Corona Positive : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएलचे माजी चेअरमन आणि उद्योगपती ललित मोदी (Lalit Modi) यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. स्वत: ललित मोदी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रुग्णालयातील ललित यांचे फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी लंडनला एअरलिफ्ट करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं असून त्याचेही फोटो पोस्ट केले आहेत.
ललित यांनी आपले रुग्णालयातील फोटो पोस्ट करत सोबतच कॅप्शनमध्ये त्यांना होत असलेल्या त्रासासह सध्याच्या स्थितीचे अपडेटही दिले आहेत. त्यांनी लिहिलं आहे की,'इन्फ्लूएंझा आणि न्यूमोनियासह 2 आठवड्यात दोनदा कोरोनाची बाधा झाली आहे. ज्यामुळे 3 आठवडे रुग्णालयाच राहिल्यानंतर अखेर डॉक्टरांच्या मदतीने माझ्या मुलाने मला लंडनमध्ये एअरलिफ्ट केले आहे. एअर अॅम्ब्युलन्सने मी लंडनमध्ये उतरलो आहे. उड्डाण सुरळीत होते. पण मी अजूनही 24 तास ऑक्सिजन सपोर्टवरच आहे. माझी काळजी घेणाऱ्या सर्वांचे आभार. मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. सर्वांना माझं प्रेम.
View this post on Instagram
एअरलिफ्ट करत एअर अॅम्ब्युलन्सने ललित मोदी लंडनमध्ये
View this post on Instagram
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)