एक्स्प्लोर

IPL Auction 2021: लिलावात 'या' तीन खेळाडूंवर राहणार सर्वांचं लक्ष, खरेदीसाठी होणार रस्सीखेच

IPL Auction 2021 LIVE Updates:  इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या पर्वासाठी म्हणजे आयपीएल 2021 साठीच्या लिलावात आज 292 खेळाडूंवर बोली लागणार आहे. मात्र यातील केवळ 61 खेळाडूंचं नशीब चमकणार आहे, कारण आठ संघांमध्ये सध्या इतकेच स्लॉट सध्या शिल्लक आहेत.

IPL Auction 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनसाठी लिलाव प्रक्रिया आज चेन्नईत पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता ऑक्शन सुरु होईल. यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये 292 खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. त्यापैकी फक्त 61 खेळाडूंनाच करारबद्ध केलं जाणार आहे. IPL 2021 मध्ये 1114 खेळाडूंनी स्वारस्य दाखवलं होतं. दरम्यान, या खेळाडूंपैकी 164 खेळाडू हे भारतीय आहेत. तर, परदेशी खेळाडूंचा आकडा 125 इतका आहे. 3 खेळाडू आयसीसीशी संलग्न राष्ट्रांतील असल्याची माहिती आहे. या लिलावात तीन खेळाडू असे आहेत, ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या तिघांना खरेदी करण्यासाठी चांगलीच रस्सीखेच होऊ शकते.

1- डेविड मलान आयसीसी टी20 इंटरनेशनल रॅंकिंगमध्ये जगात नंबर वन असलेला फलंदाज डेविड मलानवर पैशांची बरसात होऊ शकते. मलानची बेस प्राईज दीड करोड रुपये आहे. टी 20 मध्ये मलानचं प्रदर्शन जबरदस्त राहिलेलं आहे. मलाननं इंग्लंडकडून खेळताना 19 टी20 सामन्यात 53.44 च्या सरासरीनं आणि 150 च्या स्ट्राईक रेटनं 855 धावा बनवल्या आहेत. यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

IPL Auction 2021 live streaming | जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकाल आयपीएलचा लिलाव

2- ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा धाकड खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडेही सर्वांचं लक्ष असेल. मागील 2020 च्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेलचं प्रदर्शन अत्यंत खराब राहिलं होतं. एकही षटकार त्यानं लावला नव्हता. यानंतर आयपीएल 2021 साठी किंग्स इलेवन पंजाबने त्याला रिलिज केलं आहे. आता आयपीएल भारतात होणार आहे. अशात ग्लेन मॅक्सवेलवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात ग्लेन मॅक्सवेलची बेस प्राईज दोन करोड रुपये आहे.

3- स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्सने आपला कर्णधार स्टीव्ह स्मिथला आयपीएल 2021 च्या लिलावाआधी रिलिज केलं आहे. स्टीव्ह स्मिथनं आयपीएल 2020 च्या 14 सामन्यांमध्ये 311 धावा केल्या होत्या. .त्यानंतरही स्टीव्ह स्मिथला आयपीएल 2021 च्या लिलावात सर्वाधिक रक्कर मिळू शकते. आयपीएलमध्ये स्टीव्ह स्मिथचं करिअर जबरदस्त राहिलं आहे. त्यानं आयपीएलमध्ये 95 सामन्यात 35.34 च्या सरासरीनं 2333 धावा केल्या आहेत.

IPL Auction 2021 | लिलावाला चला तुम्ही, आयपीएलच्या लिलावाला चला...

या खेळाडूंकडेही लक्ष

आयपीएलच्या या लिलावात भारताच्या हरभजन सिंग आणि केदार जाधव यांच्यासह अकरा परदेशी शिलेदारांना मोठा भाव येण्याची शक्यता आहे. हरभजन आणि केदार जाधव यांना चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या कॉण्ट्रॅक्टमधून पुन्हा लिलावासाठी मोकळं केलं आहे. त्या दोघांसह अकरा परदेशी शिलेदारांची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. शकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लन्केट, जेसन रॉय आणि मार्क वूड यांचा त्या अकराजणांत समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget