IPL Auction 2022 : 10.75 कोटीच्या बोलीवर हर्षल पटेल राजस्थानच्या ताफ्यात, जेसन होल्डरसाठी 8.75 कोटी, नितीश राणासाठीही मोठी रक्कम
IPL Mega Auction 2022 : आईपीएल 2022 चा लिलाव सुरू आहे. दुसऱ्या फेरीत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळालं. जेसन होल्डर 8.75 कोटींना आणि शिमरॉन हेटमायरला 8.50 कोटींना विकले गेले.
IPL Mega Auction 2022 : आईपीएल 2022 (IPL 2022) चा लिलाव सुरू आहे. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या फेरीत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. अष्टपैलू जेसन होल्डरला लखनौने 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले. तर, स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर 8.50 कोटी रुपयांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सच्या (RCB) संघात सामील झाला. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने भारताचा युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला मोठ्या रकमेत विकत घेतले. तो बंगळुरू संघाचा भाग होता. आरसीबीने हर्षल पटेलला 10.75 कोटींना खरेदी केले. गेल्या मोसमात हर्षलने सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. गेल्या मोसमातही लिलावात देवदत्त पडिक्कलसाठी सर्व फ्रँचायझींमध्ये चांगलीच स्पर्धा होती. शेवटी, राजस्थान रॉयल्सने (RR) त्याला 7.75 कोटी रुपयांना विकत घेतले.
सुरेश रैनासह दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही
सुरेश रैनाला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. त्याची मूळ किंमत दोन कोटी होती. गेल्या मोसमापर्यंत तो चेन्नईसोबत होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथलाही आयपीएलमध्ये खरेदीदार मिळालेला नाही. डेव्हिड मिलरला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. हे सर्व खेळाडू दिग्गज आहेत, मात्र त्यांचे नशीब चांगले नसल्याने पहिल्या दिवशी त्यांना खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. त्याचबरोबर बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनही दुसऱ्या फेरीत विकला गेला नाही. मात्र, त्यांना अजून एक संधी आहे.
दुसऱ्या सेटमध्ये 'या' खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला
हर्षल पटेल - रु. 10.75 कोटी, आरसीबी
दीपक हुडा - रु. 5.75 कोटी, लखनौ
जेसन होल्डर - रु. 8.75 कोटी लखनौ
नितीश राणा - रु. 8 कोटी, कोलकाता
ड्वेन ब्राव्हो - 4.40 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
देवदत्त पडिकल - 7.75 कोटी, राजस्थान रॉयल्स
रॉबिन उथप्पा - 2 कोटी रुपये, चेन्नई सुपर किंग्स
मनीष पांडे - 4.60 कोटी, लखनौ
हेटमायर - 8.50 कोटी, राजस्थान रॉयल्स
जेसन रॉय - 2 कोटी रुपये, गुजरात टायटन्स
संबंधित बातम्या :
- IPL Auction 2022 : श्रेयस अय्यरपासून रबाडापर्यंत, पहिल्या फेरीत 'या' 10 खेळाडूंवर पैशांचा पाऊस
- IPL 2022 Auction Live : आयपीएल 2022 च्या रणसंग्रामासाठी लिलाव प्रक्रिया, पाहा प्रत्येक अपडेट्स
- IPL Auction 2022 : शिखर धवनवर सव्वा आठ कोटी, अश्विनवर पाच कोटींची यशस्वी बोली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha