Kavya Maran : काव्या मारन भर मैदानात ढसाढसा रडली, आयपीएलच्या फायनलमध्ये येऊन सनरायजर्स हैदराबादचा दारुण पराभव
Kavya Maran, IPL Final 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा दारुण पराभव करुन आयपीएल चषकावर तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. संपूर्ण हंगामात दिमाखदार कामगिरी करणारे हैदराबादचे खेळाडू अंतिम सामन्यात मात्र, सपशेल अपयशी ठरले आहेत.
Kavya Maran, IPL Final 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा दारुण पराभव करुन आयपीएल चषकावर तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. संपूर्ण हंगामात दिमाखदार कामगिरी करणारे हैदराबादचे खेळाडू अंतिम सामन्यात मात्र, सपशेल अपयशी ठरले आहेत. दरम्यान, फायनलमध्ये हैदराबादचा पराभव झाल्यानंतर सनरायजर्सची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) ढसाढसा रडताना दिसली आहे. काव्या मारनने आयपीएलच्या लिलावात 20 कोटींची बोली लावत पॅट कमिंसला आपल्या संघात खेचून आणले होते. त्यानंतर पॅट कमिंसनेही संपूर्ण हंगामात अतिशय चांगली कामगिरी करत हैदराबादला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला. कमिंसने आयपीएलमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी केली. त्यामुळे काव्या मारनच्या (Kavya Maran) निर्णयांचे सर्वांकडून कौतुक होत होते. उपांत्य फेरीत हैदराबादने विजय मिळवल्यानंतर काव्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र, अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर मात्र, काव्या मारन (Kavya Maran) ढसाढसा रडताना दिसली आहे.
A season to be proud of 🧡#KKRvSRH #IPLonJioCinema #IPLFinalonJioCinema pic.twitter.com/rmgo2nU2JM
— JioCinema (@JioCinema) May 26, 2024
Kavya Maran may have been hiding her tears, but her love and appreciation for #KKR remains strong. 💛 We see you, Kavya! #IPL2024 #CricketTwitter #Emotions pic.twitter.com/czX903iTKU
— Vikram Verma (@vikramsnatak) May 26, 2024
हैदराबादचे 114 धावांचे आव्हान केकेआर सहज गाठले
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, सनरायजर्सच्या फलंदाजांना नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. हैदराबादचा संघ सर्वबाद 113 धावा करु शकला. केकेआरने हैदराबादचे 114 धावांचे आव्हान केवळ 10.3 षटकांमध्ये गाठले. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिंसने 24 धावा केल्या. कमिंस शिवाय, मार्करम 20 केल्या. मात्र, इतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या उभारणाऱ्या हैदराबादच्या संघाने फायनलमध्ये मात्र सुमार कामगिरी केली.
व्यंकटेश अय्यरची अर्धशतकी खेळी, आंद्रे रसेलच्या तीन विकेट्स
सनरायजर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर आंद्रे रसेलने 3 विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे पॅट कमिंसलाही त्यानेच तंबूत पाठवले. कमिंस शिवाय अब्दुल समद आणि अॅडम मार्करमलाही रसेलने माघारी धाडले. त्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. त्यानंतर हैदराबादने दिलेल्या 114 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने अर्धशतकी खेळी केली. त्याने 26 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली. व्यंकटेश अय्यर शिवाय, रहमदुल्लाह गुरबाजनेही 39 धावा करत महत्वपूर्ण भूमिका बजावली.
Kavya Maran was hiding her tears. 💔
— USMAN CHAUDHARY (@Usman_C786) May 26, 2024
- What a campaign her team had.#KKRvsSRH | #KKRvSRH | #IPLFinal pic.twitter.com/Rj4eUCRb4U
इतर महत्वाच्या बातम्या