IPL 2022 Mega Auction : IPL 2022 मध्ये मोठे फेरबदल; संघाची संख्या वाढवणार, BCCI कडून मेगा ऑक्शनची ब्लूप्रिंट तयार
बीसीसीआयने (BCCI) चार खेळाडूंच्या रिटेन्शनची परवानगी दिली आहे. बीसीसीआय या वर्षाच्या अखेरपर्यंत मोठा लिलाव (IPL Auction) भरवण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2022 पासून 10 संघ सहभागी होणार आहेत. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) येत्या हंगामाबात विचार करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षीपासूव दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सहभागी करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआयकडे याची ब्लूप्रिंट तयार आहे. दोन नवीन संघासाठी ऑगस्टमध्ये बोली लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसा, यामध्ये कोलकाताच्या आरपी- संजीव यांचा गोयंका ग्रुप, अदानी ग्रुप, अहमदाबाद आणि अरबिंदो फार्मा लिमिटेड, हैदराबाद, गुजरातचा टोरेंट ग्रुप सहभागी होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने नव्या हंगामासाठी सॅलरी पर्समधील रक्कम वाढवली आहे. 85 कोटीवरून ही रक्कम आता 90 कोटी करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात ही रक्कम वाढून 95 कोटीपर्यंत जाईल आणि 2024 च्या सीजन अगोदर ही रक्कम 100 कोटी इतकी होण्याची शक्यता आहे.
खेळाडू रिटेंशन देखील फायनल करण्यात आले आहे. प्रत्येक संघाला चार खेळाडून रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन भारतीय खेळाडू आणि एक विदेशी खेळाडू किंवा दोन भारतीय आणि दोन विदेशी खेळाडू रिटेन करता येणार आहे. रिटेंशन करणाऱ्या संघाची रक्कम कापण्यात येणार आहे. सध्याच्या नियमानुसार तीन खेळाडू रिटेन करायचे असेल तर 15 कोटी, 11 कोटी आणि 7 कोटी रुपये आणि दोन खेळाडू रिटेन करायचे असेल तर 12.5 कोटी आणि 8.5 कोटी तर एका खेळाडूच्या रिटेनसाठी 12.5 कोटी रक्कम कापण्यात येणार आहे. आता बीसीसीआयने 5 कोटी रक्कमेबरोबर चार खेळाडूंच्या रिटेन्शनची परवानगी दिली आहे. बीसीसीआय या वर्षाच्या अखेरपर्यंत मोठा लिलाव भरवण्याची शक्यता आहे. मीडिया राईट्सबद्दल देखील लिलाव भरवण्याची शक्यता आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021 Update)सीझन 14 चा दुसरा टप्पा युएईमध्ये खेळला जाणार आहे. आयपीएल 14 (IPL 2021) पुन्हा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार