एक्स्प्लोर

IPL 2021: अजूनही प्ले ऑफमध्ये जाऊ शकते मुंबई! मात्र त्यासाठी 'ही' दिव्य कामगिरी करावी लागणार

IPL 2021 mumbai indians : आज जर मुंबईनं सामना गमावला तर मुंबई सहज प्ले ऑफमधून बाहेर पडेल. तसंही मुंबईचा प्ले ऑफचा खूप कठिण झाला आहे.  

IPL 2021: इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने शारजाह येथे खेळलेल्या IPL 2021 च्या 54 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 86 धावांनी पराभव केला. यासह, केकेआरने प्लेऑफसाठी आपला दावा भक्कम केला आहे.  कोलकात्याचे आता 14 गुण झाले असून आता त्यांचं प्ले ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. आज जर मुंबईनं सामना गमावला तर मुंबई सहज प्ले ऑफमधून बाहेर पडेल. तसंही मुंबईचा प्ले ऑफचा खूप कठिण झाला आहे.  

मुंबई इंडियन्स जर आज सामना 14  गुण मिळवण्याची संधी आहे. पण त्यांच्यासमोर नेट रनरेटचं भलंमोठं चॅलेंज आहे. कोलकाता संघाने राजस्थानविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा रनरेट सर्व संघापेक्षा अधिक आहे. त्यांचा +0.785 रनरेट आहे. तर, मुंबईचे सध्या 12 गुण असून – 0.048 रनरेट आहे. मुंबईचा एक सामना बाकी आहे.  आज मुंबई हैदराबादविरुद्ध लढणार आहे. या सामन्यात मुंबईला विजय आवश्यक आहे, मात्र हा विजय त्यांना भल्यामोठ्या फरकाने मिळवावा लागणार आहे. त्यातही हैदराबादनं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली तरीही मुंबई प्ले ऑफमधून बाहेर पडेल. 

चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरु संघानं आपले प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले आहेत. दिल्ली 20 अंकांसह टॉपवर आहे तर चेन्नई 18 अंकांसह नंबर दोनवर आहे तर बंगळुरुचे 16 अंक असून तिसऱ्या नंबरवर आहे. तर कोलकाता 14 अंकांसह चौथ्या नंबरवर आहे. आता चौथ्या स्थानासाठी मुंबईला न भुतो न भविष्यती असा विजय साकारावा लागणार आहे. पंजाबचे गुणतालिकेत 12 गुण आहेत, तर राजस्थानही पराभूत झाल्यामुळे 10 गुणांवर कायम राहिले. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. सनरायझर्स हैदराबाद या स्पर्धेतून खराब कामगिरीमुळे सर्वात आधी बाहेर पडला आहे.

आजचा सामना जर मुंबईचा संघ हरला तर कोलकाता त्यांच्या गुणांच्या आधारेच प्लऑफसाठी थेट पात्र होईल. पण जर मुंबईने हा सामना जिंकला, तर मात्र नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबतीत जर मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा झाल्यास त्यांना कोलकातापेक्षाही अधिक रनरेट मिळवावा लागेल. मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 200 धावा करुन हैदराबादला 170 पेक्षाही अधिक धावांनी पराभूत करावे लागेल. तसेच जर त्यांना या सामन्यात धावांचा पाठलाग करावा लागला, तर मात्र त्यांचा नेटरनरेट कोलकातापेक्षा अधिक होणार नाही. हैदराबादने प्रथम फलंदाजीसाठी उतरताच मुंबईचे आयपीएल 2021 मधील आव्हान संपुष्टात येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget