IPL 2021, RR vs MI: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार; जाणून घ्या दोन्ही संघांचे Playing 11
Rajasthan Royals vs Mumbai Indians: राजस्थान रॉयल्स (RR) आमि मुंबई इंडियन्स (MI) मैच शारजाह क्रिकेट स्टेडियम यांच्यात होणार आहे. शारजाहच्या मैदानावर हा सामना खळण्यात येणार आहे.
मुंबई : आज आयपीएल 2021 (IPL 2021) च्या मैदानात राजस्थान रॉयल्स (RR) आमि मुंबई इंडियन्स (MI) मैच शारजाह क्रिकेट स्टेडियम यांच्यात होणार आहे. शारजाहच्या मैदानावर हा सामना खळण्यात येणार आहे. हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल.
सध्या दोन्ही सघांने आयपीएलमध्ये 12 सामने खेळले असून 10 गुणसंख्या आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma)च्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स (MI) ची कामगिरी काही खास नाही. मुंबईने खेळलेल्या मागील पाच सामन्यांपैकी चार सामने गमावले आहे. फक्त पंजाबच्या विरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यामध्ये मुंबईला विजय मिळाला होता. राजस्थानची परिस्थिती देखील काहीशी अशी आहे. राजस्थानने गेल्या मॅचमध्ये चेन्नईला हरवत (CSK) प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले होते.
मुंबई आणि राजस्थान हे दोन्ही आतापर्यंत 24 वेळा आमने सामने आले आहे. मुंबईने आतपर्यंत 24 पैकी 12 सामने जिंकले आहे. तर राजस्थान रॉयल्सने 11 सामन्यात यश मिळाले आहे. या 24 पैकी एक सामना अनिर्णयीत आहे. दोन्ही संघाचे मागील आकडे पाहता आजचा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
आज ज्या संघाला यश मिळणार त्या संघाचा प्लेऑफचा मार्ग सोपा होणार आहे. आजचा सामना जिंकल्यानंतर विजेता संघाचे गुण होतील त्यानंतर हा संघ चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित करेल. सध्या चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स हा संघ आहे. पुढे जाण्यासाठी संघाना त्यांचा रनरेट चांगला ठेवणे गरजेचे आहे. चांगल्या रनरेटसह जो संघ जिंकेल त्या संघाचा प्लेऑफचा मार्ग सुकर होणार आहे. तर हरणारा संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर होणार आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य संघ :
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य Playing 11- एविन लुइस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेट कीपर), शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेविड मिलर, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया आणि मुस्तफिजुर रहमान
मुंबई इंडियन्स चे संभाव्य Playing 11- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कूल्टर नाइल, जयंत यादव, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट