IPL 2021 RCB vs KKR Score : डिव्हिलियर्स, मॅक्सवेलचा झंझावात, बंगळुरुचं कोलकात्यासमोर 205 धावांचं आव्हान
IPL 2021 RCB vs KKR Cricket Score: ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर बंगळुरुनं कोलकात्यासमोर विजयासाठी 205 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
IPL 2021 RCB vs KKR Cricket Score : विराट कोहलीचा बंगळुरु आणि इयान मॉर्गनच्या कोलकातामध्ये आयपीएलचा सामना सुरु आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरुनं कोलकात्यासमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर बंगळुरुनं कोलकात्यासमोर विजयासाठी 205 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
जबरदस्त फार्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं 48 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. तर एबी डिव्हिलियर्सनं केवळ 34 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी केली. त्यानेही 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. बंगळुरुची सुरुवात तशी चांगली झाली नाही. कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटिदार एकापाठोपाठ बाद झाले. विराट 5 धावांवर तर रजत पाटिदार एक धाव करुन बाद झाला.
त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं आधी देवदत्त पडिक्कलसोबत चांगली भागिदारी केली. मात्र देवदत्त पडिक्कल 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल जोडीनं संघाला दोनशेच्या पार नेऊन ठेवले.