IPL 2021, KKR vs PBKS : पंजाब किंग्ससाठी आजचा सामना 'करो या मरो', कोलकता नाईट रायर्डसवर मात करणार?
IPL 2021, Kolkata Knight Riders vs Punjab Kings: इयॉन मार्गनच्या टीमने सध्या 11 मॅचमध्ये 10 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आहे. केकेआरची फलंदाजी टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
IPL 2021, KKR vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या 45व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर पंजाब किंग्जसोबत होणार आहे. दुबई इंटरननॅशनल स्टेडिअममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा प्रयत्न प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा असेल. कोलकाताने सर्वांना आश्चर्यचकित करत टॉप 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
इयॉन मार्गनच्या टीमने सध्या 11 मॅचमध्ये 10 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आहे. केकेआरची फलंदाजी टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वेंकटेश अय्यरने शानदार सुरुवात करत टॉप ऑर्डर सांभाळली आहे. तर दुसरीकडे शुभमन गिल आणि नितीश राणा देखील चांगली कामगिरी करत आहे. परंतु कर्णधार इयॉन मॉर्गनी कामगिरी सध्या संघासाठी चिंतेचा विषय आहे.पंजाब किंग्ज विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. आंद्रे रसेलसंबधी देखील टीमने काही अपडेट दिले नाही.
आयपीएलच्या इतिहासात जेव्हा कोलकाता आणि पंजाबचे संघ समोरासमोर आले आहे त्यावेळी केकेआरचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत या दोघांमध्ये 28 सामने खेळवण्यात आले आहे. त्यापैकी 19 सामन्यात केकेआर जिंकली आहे. तर पंजाबला फक्त 9 सामन्यात विजय मिळाला आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य संघ :
KKR: शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इयोन मोर्गन (कॅप्चन), नितिश राणा, दिनेश कार्तिक (wk), संदीप वारियर, , टिम साउथी, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन और लॉकी फर्ग्यूसन.