IPL 2021, KKR vs SRH: वॉर्नर विरुद्ध मॉर्गन, दोन विदेशी कर्णधारांमधील लढत, अशी असेल कोलकाता आणि हैदराबादची प्लेईंग इलेव्हन
IPL 2021, KKR vs SRH: आज आयपीएल 2021 मधील तिसरा सामना चेन्नईत रंगणार आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना असणार आहे हैदराबाद विरुद्ध कोलकाता. दोन विदेशी कर्णधार असलेले संघ आज आमनेसामने असणार आहेत.
IPL 2021, KKR vs SRH: आज आयपीएल 2021 मधील तिसरा सामना चेन्नईत रंगणार आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना असणार आहे हैदराबाद विरुद्ध कोलकाता. दोन विदेशी कर्णधार असलेले संघ आज आमनेसामने असणार आहेत. आतापर्यंत कोलकाता नाइटराइडर्सने दोन आयपीएल जिंकल्या आहेत तर हैदराबादनं एकदा हा किताब आपल्या नावावर केला आहे.
मॉर्गनच्या नेतृत्वात खेळत असलेल्या कोलकाता संघाकडे फलंदाजीची भक्कम फळी आहे. शुभमन गिल, राहुल त्रिपाठीसह नितीश राणा, दिनेश कार्तिक, मॉर्गन आणि शाकिब यांच्यासारखे धुरंधर कोलकाताकडे आहेत. तर आंद्रे रसेल आणि सुनील नारायण असे धडाकेबाज ऑलराऊंडर देखील त्यांच्याकडे आहेत. प्रसिध कृष्णा, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसनअसे वेगवान गोलंदाज तसेच सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग असे फिरकी गोलंदाज देखील त्यांच्याकडे आहेत.
सनराइजर्स हैदराबादकडे वॉर्नर आणि बेअरस्टोसह मनिष पांडे, प्रियम गर्ग,वृद्धीमान साहा, अशी युवा फलंदाजांची फळी आहे. तर राशिद खान सारखा अनुभवी ऑलराऊंडर. भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर, टी नटराजन, शाहबाज नदीम अशी वेगवान गोलंदाजांची फौज आहे.
संभाव्य टीम
कोलकाता नाइटरायडर्स: शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, अँड्र्यु रसेल, सुनिल नरेन किंवा शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, शिवम मावी किंवा हरभजन सिंग, प्रसिद्ध क्रिष्णा, वरुण चक्रवर्थी
सनराईजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे, प्रियम गर्ग,वृद्धीमान साहा, अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, शाहबाज नदीम