IPL 2021 RCB vs RR : बंगळूरू आणि राजस्थानमध्ये आज रंगणार सामना, प्लेइंग इलेव्हन ते खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
संजू सॅमसनच्या राजस्थानने आयपीएलच्या या हंगामात काही खास कामगिरी केली नाही. राजस्थानच्या संघातील ऑलराउंडर बेन स्टोक्सला दुखापत झाल्याने ते हंगामाबाहेर आहे.
IPL 2021 RCB vs RR : विराट कोहलीचा बंगळुरु आणि संजू सॅमसनच्या राजस्थान या दोन संघांमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना रंगणार आहे. बंगळूरूने 6 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान आतापर्यंत खेळलेल्या तीन मॅचपैकी 1 मॅच जिंकून पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
संजू सॅमसनच्या राजस्थानने आयपीएलच्या या हंगामात काही खास कामगिरी केली नाही. राजस्थानच्या संघातील ऑलराउंडर बेन स्टोक्सला दुखापत झाल्याने ते हंगामाबाहेर आहे. दुसरीकडे विराट कोहलीचा संघ उत्तम कामगिरी करत आहे. बंगळूरुचा संघ फलंदाज कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलवर निर्भर आहे.
- बंगळूरु आणि राजस्थान IPL 2021 मॅच कधी आहे?
बंगळूरू आणि राजस्थान यांच्यामध्ये 22 एप्रिलला खेळवला जाणार आहे.
- बंगळूरू आणि राजस्थान आयपीएल 2021 मॅच कुठे खेळवला जाणार आहे?
बंगळूरू आणि राजस्थान आयपीएल 2021 मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
बंगळूरू: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मैक्सवेल, एबी डीविलियर्स (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, काइल जैमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
राजस्थान : जोस बटलर, मनन वोहरा, संजू सैमसन (कर्णधार), शिवम दूबे, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, मुस्तफिजुर रहमान